राज्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
राज्यातील खेडेगावात आज सुद्धा पक्के रस्ते नाही तसेच येण्याजाण्यासाठी पुरेशी वाहतुकीची साधने देखील उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा खेडेगावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून विद्यालयात जाण्यासाठी मैलो दूर उन्हातून पायी चालत जावे लागते त्यामुळे त्यांचा बहुतांश वेळ विद्यालयात येण्या-जाण्यासाठी खर्च होतो तसेच राज्यातील बहुतांश कुटुंबे हि गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या मुलांच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांसाठी सायकल घेणे शक्य नसते त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने विद्यालयीन मुलांना सायकल देण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ची सुरुवात केली.
या योजनेअंतर्गत ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे घरापासून महाविद्यालयीन अंतर 2 कि.मी. असेल अशा विद्यार्थ्यांना मोफत सायकली दिल्या जातात.
योजनेचे नाव | मोफत सायकल वाटप योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | पुणे समाज विकास विभाग |
लाभार्थी | राज्यातील विद्यार्थी |
योजनेचा लाभ | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
योजनेचे उद्दिष्ट:
- मोफत सायकल वाटप योजना च्या माध्यमातून महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीचे समाधान करणे.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा विद्यालयात येण्या जाण्याचा वेळ वाचेल जो वेळ ते अभ्यासात वापरू शकतील.
- या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येते.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे घरापासून महाविद्यालयीन अंतर 2 कि.मी. असेल असे विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना होणारा फायदा
- या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयात जाण्यासाठी मैलो अंतर पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे त्यांचा पैसे आणि वेळ यांची बचत होईल.
- विद्यार्थ्यांना तासंतास बस ची वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी आपल्या अडचणी दूर करून आपली शिक्षा पूर्ण करू शकतील.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडण्याची आवश्यकता भासणार नाही
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार विद्यार्थ्यांचे कुटुंब पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
- मागील उत्तीर्ण परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असावेत.
- विद्यार्थ्याच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे किमान अंतर 2 किलोमीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक.
- दिनांक 01 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही.
- कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
- स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न कारने आवश्यक आहे.
- अटी व नियम यांत बदल करण्याचा/अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
आवश्यक कागदपत्रे:
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (दूरध्वनी) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
- रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
- वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
- मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- मागील वर्षाची गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे राष्ट्रयीकृत बँकेत बचत खाते असणे आवशयक
अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार विद्यार्थी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास
- विद्यार्थ्याने या पूर्वी एखाद्या योजनेअंतर्गत सायकलीचा लाभ मिळवला असल्यास
- अर्जदार विद्यार्थ्यांचे महाविद्यालय आणि घर यांमधील अंतर्गत 2 किलोमीटर पेक्षा जास्त नसल्यास
- विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास
- विद्यार्थ्याने अर्जात खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अजदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
- होम पेज वर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून जतन करा बटनावर क्लिक करून स्वतःचे रेजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
- आता तुम्हाला योजना पर्यायावर क्लिक करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर या योजनेचं अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्या व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक अशा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडून सदर अर्ज जमा करावा.
Telegram Goup | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पत्ता | पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, मंगला थिएटरजवळ, शिवाजी नगर, पुणे- 411 005 |
दूरध्वनी | 020-25501000 020-255011130 1800-1030-222 |
ई-मेल आयडी | info[At]punecorporation[Dot]org |