श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना: महाराष्ट्र राज्यातील गरजू, गरीब, आर्थिक दृष्ट्या कमजोर, निराधार वृद्ध व्यक्तीं ज्यांचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांना महाराष्ट शासनाच्या श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत प्रति महिना 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा नाव नसलेल्या 65 वर्ष व 65 वर्षावरील जेष्ठ निराधार स्त्री / पुरुषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्टीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना मधून प्रत्येक महिन्याला 1,500/- रुपयांची आर्थिक सहायता करण्यात येते.
या योजनेस पूरक असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना मधून प्रतिमहिना 1,500/- रुपये रक्कम निवृत्तीवेतन अनुदान देण्यात येते म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी जेष्ठ नागरिकास प्रतिमाह 3,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते.
या योजनेअंतर्गत गट अ आणि गट ब असे दोन गट करण्यात आले आहेत
गट अ | दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. |
गट ब | दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. |
योजनेचे नाव | श्रावण बाळ योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक |
लाभ | प्रतिमहिने 1,500/- रुपये आर्थिक सहायत्ता |
योजनेची सुरुवात | 2016 |
योजनेचे उद्दिष्ट्य | राज्यतील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्यता करणे |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे जेणेकरून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश्य समोर ठेवून श्रावण बाळ निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि वृद्धकाळात त्यांचे हाल कमी करून त्यांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देण्याचे उद्दीष्ट आहे.
- राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना वृद्धपणी सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब वृद्ध नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील पुरुष/महिला जेष्ठ नागरिक श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ज्यांच्याकडे कोणतेही नियमित उत्पन्नाचे साधन नाही.
- ज्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबात कोणतेही सदस्य नाहीत जे त्यांची काळजी घेऊ शकतात.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
दरमहा 1,500/- रुपये निवृत्तीवेतन.
योजनेचा फायदा:
- श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून वृद्ध व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
- या योजनेमुळे जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक समस्येवर मात करतील.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
योजनेचे नियम व अटी:
- श्रावण बाळ निराधार योजना चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
- रहिवाशी: योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब: लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
- वार्षिक उत्पन्न: लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
- बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
- महाराष्ट्र राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ही योजना केवळ निवडक ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- वयाचा दाखला: लाभार्थी व्यक्तीचा वयाचा दाखला (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
- वास्तव्याचा दाखला: महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाइल प्रमाणपत्र/ग्रामपंचायत/नगरसेवक दाखला)
- उत्पन्नाचा दाखला: (वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयांपेक्षा जास्त नसावे)
- ओळखपत्र: अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र: पिवळे (BPL) रेशन कार्ड,दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
- घरपट्टी पावती
- पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल
- मतदान कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:
- रहिवाशी: अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- वय: अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- चुकीची माहिती: अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- दरमहा अनुदान: अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत दरमहा अनुदान प्राप्त करत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- एकावेळी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.
- वार्षिक उत्पन्न: अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000/- पेक्षा जास्त असल्यास.
- दारिद्र रेषेखालील कुटुंब: ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत अर्जदाराचे नाव समाविष्ट नसल्यास.
योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय/तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा व सदर योजनेअंतर्गत अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली माहिती भरून योग्य ती कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडून अर्ज सादर करावा व अर्ज भरल्याची पोच पावती संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर वर New User & Register Here वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला OPTION 1 आणि OPTION 2 दिसतील तुम्ही ह्या दोन OPTION पैकी कोणत्याही OPTION ने अर्ज करू शकता.
महत्वाच्या बाबी:
- सदर योजना 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहे.
- निवृत्तीवेतन दर तीन महिन्यांनी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
OPTION 1 चा पर्याय निवडल्यास: OPTION 1 पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल
User Id आणि Password बनवल्यानंतर तुम्हाला Login करून या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo, Identy Proof,Address Proof, Bank Account, IFSC Code, Email इत्यादी) भरावी लागेल.
OPTION 2 चा पर्याय निवडल्यास: OPTION 2 पर्याय निवडल्यास तुम्हाला या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo, Identy Proof, Address Proof, Bank Account, IFSC Code, Email इत्यादी) भरावी लागेल नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत व सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया:
- सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- तुमच्या समोर जे होमपेज ओपन होईल त्याच्यावर Track Your Application वर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून Go वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्यासमोर दिसेल.
लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया:
- सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होमपेज ओपन होईल त्याच्यावर असलेल्या लाभार्थी यादी वर क्लिक करावे.
- आता तुम्हाला तुमचा जिल्हा / गाव / ब्लॉक निवडावे लागेल व सबमिट वर क्लिक करावे लागेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर उपलब्ध होईल.
अधिकृत वेबसाईट | |
टोल फ्री क्रमांक | 1800-120-8040 |
महाराष्ट्र शासनाचा निर्णय | डाउनलोड |
Join Telegram Channel | Click Here |
लक्षात ठेवा:
- योजनेचे नियम व अटी यांमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शकता असू शकते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टल ला किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय/सामाजिक सुरक्षा कार्यालयाशी / तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा
- योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक वाचा.
- आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करा.
- अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा व त्याआधीच अर्ज जमा करा.
- अर्ज भरताना किंवा अर्ज करताना तुम्हाला काही अडचण आल्यास, जवळच्या सामाजिक सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधा.