महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये आर्थिक मदत, अनुदान, प्रशिक्षण आणि इतर सुविधांचा समावेश आहे. काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत:
1) जलयुक्त शिवार योजना:
महाराष्ट्र राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषि क्षेत्रावर होतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडीत पर्जन्यमान यामुळे कृषि क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सन 2015 पासून राबविण्यात आले.
जलयुक्त शिवार योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
2) ई पीक पाहणी:
शासन निर्णयान्वये राज्यातील पिक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील अँप द्वारा गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला आहे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्या अन्वये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यातील सामंजस्य करारान्वये टाटा ट्रस्टने E Pik Pahani हे मोबाईल अँप विकसित केले आहे.
ई पीक पाहणी योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
3) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना:
या योजनेअंतर्ग राज्यातील ज्या शेतमजुरांकडे स्वतःची शेतजमीन नाही अशा मजुरांना 2 एकर ओलीताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमीन खरेदी करण्यासाठी 50% अनुदान व 50% बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यांत येते.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
4) मिनी ट्रॅक्टर योजना:
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता मिनी ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत करण्यात येते.
मिनी ट्रॅक्टर योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
5) राजे यशवंतराव होळकर महामेष योजना:
महाराष्ट्र राज्यात स्वरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 20 मेंढ्या व 1 नर मेंढ्याचे वाटप केले जाते. तसेच मेंढी पालनासाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान दिले जाते. तसेच मेंढ्यांना खाद्य कमतरता पडू नये यासाठी हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
6) मागेल त्याला विहीर योजना:
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येते.
मागेल त्याला विहीर योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
7) मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:
शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील कृषी वापरासाठी पारेषण विरहित 1 लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्यात उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
8) महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना:
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे व लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
9) प्रधानमंत्री पीक विमा योजना:
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
10) अटल बांबू समृद्धी योजना:
शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतक-यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृध्दी योजना या नावाने नवीन योजना सुरु करण्यात आली आहे योजनेअंतर्गत बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देण्यात येते.
अटल बांबू समृद्धी योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
11) डिजल पंप सब्सिडी योजना:
राज्यातील शेतकऱ्यांना विहीर, नदी, कालवा, शेततळे यांमधून शेत पिकांसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल पंपाच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे व पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान थांबविणे हा या योजनेचा एक मुख्य उद्देश आहे. डिजल पंप सब्सिडी योजना अंतर्गत शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना डिजल पंप खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते.
डिजल पंप सब्सिडी योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
12) मल्चिंग पेपर योजना महाराष्ट्र:
मल्चिंग पेपर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देऊन शेतीसाठी प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर देणे
मल्चिंग पेपर योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
13) कृषी ड्रोन अनुदान योजना:
कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देऊन शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश्य आहे.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी ड्रोन च्या खरेदीसाठी 5 लाखाचे अनुदान देण्यात येते.
कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
14) प्रधानमंत्री स्वामित्व योजना:
या योजनेअंतर्गत जमिनीचे जे मालक आहेत त्यांना E Property कार्ड वितरीत करण्यात येते. या योजनेअंतर्गत जमीन मालकांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर SMS येईल ज्यावर क्लीक करून ते त्यांचे संपत्ती कार्ड (E Property Card )डाऊनलोड करू शकणार आहेत
प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
15) गाय गोठा अनुदान योजना:
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय, म्हशी, शेळी, कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
गाय गोठा अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना:
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यात मदत करण्याच्या दृष्टीने २.५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतात आधुनिक तंत्रांचा वापर करून आपले उत्पन्न वाढवू शकतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
17) शेळी मेंढी पालन योजना:
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला उस्मानाबादी / संगमनेरी किंवा स्थानिक वातावरण तग धरतील अशा प्रजातीच्या पैदासक्षम 10 शेळ्या + 1 बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातीच्या 10 मेंढ्या + 1 नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल.
शेळी मेंढी पालन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
18) ट्रॅक्टर अनुदान योजना:
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी अनुदान देणे व कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
19) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना:
एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाल्यास रुपये २ लाख रक्कम नुकसान भरपाई देण्यात येते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
20) गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना:
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी कुक्कुट तलंगा सुधारित पिल्ले यांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेतील जेणेकरून ते स्वतःचा स्वरोजगार सुरु करू शकतील.आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Telegram Channel | येथे क्लिक करा |