Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi

भारतातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांचा विमा उतरवला जातो जेणेकरून त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यात येते.

आपल्या देशात बहुतांश नागरिक दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना आपल्या परिवाराच्या गरज पूर्ण करता येत नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असणे आवश्यक आहे परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.
एका सर्वेक्षणानुसार देशातील फक्त 20 टक्के जनतेकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे परंतु 80 टक्के जनता ही विम्यापासून वंचित आहे त्यामुळे भारतातील विमा धारकांची संख्या वाढवण्याचा या योजनेअंतर्गत एक चांगला उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिक महिना फक्त 1/- रुपये भरून 2 लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्येक नागरिकाला 1/- रुपयांत 2 लाखाचा विमा लाभ उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेचे नावPM Suraksha Bima Yojana In Marathi
लाभार्थीभारतीय रहिवासी
लाभविमा सुरक्षा
उद्देश्यनागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi चा उद्देश

  • देशातील नागरिकांना कमी दरात विमा सुरक्षा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.
  • देशातील नागरिकांना विमा कवच उपलब्ध करून देणे.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi

योजनेचे वैशिष्ट्य:

  • केंद्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • देशातील नागरिकांना कमी दरात विमा सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • देशातील 16 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व बचत खाते बँक धारक या योजनेला लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट खात्यातून अथवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने या योजनेचा लाभ घेता येतो.

योजनेचे ठळक मुद्दे:

  • एखाद्या व्यक्तीची जर विविध बँकेत अनेक बचत खाते असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • लाभार्थ्यांच्या बचत खात्यातून या योजने अंतर्गत दरवर्षी 12/ रुपये वजा केली जाते.
  • ही योजना 1 वर्ष विमा संरक्षण देते त्यां नंतर लाभार्थ्यास या योजनेसाठी नूतनीकरण करावे लागते.
  • विमाधारकाचे वय 70 वर्ष पूर्ण झाल्यावर सदर विमा संरक्षण योजना संपुष्टात येते.
  • विमाधारकाच्या बचत खात्यात जर विमा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम (12/- रुपये) नसेल तर सदर विमा योजना संपुष्टात येते.
  • विमाधारकाचे बचत खाते काही कारणामुळे बंद झाले असेल तर सदर विमा योजना संपुष्टात येते.
  • योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जुन ते 31 मे असा आहे.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ खालील प्रमाणे आहे:

विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास

  • नैसर्गिक आपत्ती किंवा खुनामुळे विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते.

विमाधारकाने स्थायी अपंगत्व आल्यास

  • अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर विमा धारकाच्या डोळ्यांची संपूर्ण आणि कधीही बरी न होणारी हानी म्हणजे कायमस्वरूपी हानी झाल्यास दोन्ही हात निकामी झाल्यास अथवा दोन्ही पाय निकामी झाल्यास/एक डोळा, एक हाथ, एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास रुपये 2 लाख प्रदान केले जातात

स्थायी आंशिक अपंगत्व आल्यास

  • एका डोळ्याची बरी न होणारी हानी झाल्यास एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रुपये 1 लाख दिले जातात. विमा योजनेअंतर्गत जर विमा धारकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यास काही हानी झाली व त्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत विम्याचा लाभ मिळणार नाही तसेच आत्महत्या करताना स्थायी अपंगत्व किंवा स्थायी आंशिक अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाधारकाला कोणताच फायदा मिळणार नाही.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana In Marathi

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार व्यक्ती भारताचा नागरीक असणे आवश्यक आहे.

Pm Bima Yojana Age Limit:

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 16 वर्ष ते 70 वर्ष असणे आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्यांचे वय 70 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

योजनेचे नियम व अटी:

  • फक्त भारतीय नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • भारताच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • ज्या व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे त्याच्याजवळ स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • विमाधारकाला त्याच्या बचत खात्यामधून विम्याची प्रीमियम रक्कम Auto Debit होण्यासाठी अर्जासोबत संमत्ती पत्र जोडणे आवश्यक आहे
  • बँक खाते बंद झाल्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विम्याच्या पॉलिसी ची रक्कम 12/- रुपये वर्षातून एकदा 31 मे ला वजा करण्यात येईल.
  • विमा पॉलिसी ची रक्कम 12/- न भरल्यास विमा पॉलिसी चे नूतनीकरण करण्यात येणार नाही.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • जन्माचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत:

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सादर योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा तुम्हाला तुमच्या बचत खाता असलेल्या बँकेत जाऊन पंतप्रधान विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
  • त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा.
  • त्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी करून विम्याची रक्कम 12/- रुपये तुमच्या बँक खात्यातून वजा करेल व अशा प्रकारे तुमची विमा संरक्षण सुरू होईल.
  • तसेच तुम्ही पोस्ट खाते व सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या माध्यमातून देखील सदर पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

योजनेअंतर्गत दावा करण्याची पद्धत:

एखाद्या विमाधारकाचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रथम Claim Form भरावा लागतो व विमाधारकाचा हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाल्यास अर्जासोबत हॉस्पिटल ने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र,औषधोपचाराची सर्व माहिती व कागदपत्रे जोडावी लागतात
जर विमाधारकाचा घरीच मृत्यू झाल्यास डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला Claim Form सोबत जोडणे आवश्यक आहे.
तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीत विमाधारकाला स्थायी अपंगत्व आल्यास हॉस्पिटलचे Discharge Card आणि औषधोपचाराची सर्व माहिती सोबत जोडणे आवश्यक असेल.

Pm Bima Yojana Application Status:

  • सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल
  • आता तुमच्यासमोर चे होम पेज ओपन होईल त्याच्यावर अर्जाची स्थिती वर क्लिक करावे
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा एप्लीकेशन नंबर टाकावा लागेल रीसर्च बटन वर क्लिक करावे लागेल
  • तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला कॉम्पूटवर स्क्रीन वर दिसेल.

योजनेअंतर्गत लाभार्थी यादी बघण्याकरिता:

  • सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल
  • तुमच्यासमोर चे होम पेज ओपन होईल त्याच्यावर  लाभार्थी यादी दिसेल त्याच्यावर क्लिक करावे.
  • आता तुमच्यासमोर जे पेज ओपन होईल त्याच्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा.गांव/शहर हे निवडावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची  यादी दिसेल.
Telegram GroupJoin
योजनेचा अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here
दाव्यासाठी अर्जClick Here
संमती पत्र/घोषणा अर्जClick Here
राज्यानुसार टोल फ्री नंबरClick Here
महाराष्ट्र टोल फ्री क्रमांक1800-102-2636
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक1800-180-1111
1800-110-001

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!