प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMPVY) ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्रीय पातळीवरील पीक विमा योजना आहे. 2016 मध्ये सुरू झालेली ही योजना, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, रोग आणि किडींपासून होणाऱ्या पिक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.
देशातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे भारताला एक कृषिप्रधान देश म्हणून संबोधण्यात येते. देशातील बहुतांश शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब आहे व त्यामुळे तो स्वतःचे जीवन दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. शेतात कीटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते त्यामुळे शेतकरी शेतात खतांचा वापर करतो व फवारणी सुद्धा करतो परंतु सतत वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्यास बियाणे, खत, कीटक नाशके खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकरी बँक, वित्त संस्था किंवा साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतो व शेती करतो. परंतु दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व कर्ज फेडू न शकल्यामुळे शेतकरी स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतो. या सर्व गोष्टींचा विचार करून अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार ने 13 जानेवारी 2016 रोजी PM Pik Vima Yojana In Maharashtra सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्देश
- शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
पंतप्रधान पीक विमा योजना वैशिष्ट्ये
- प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकारद्वारे देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- देशातील शेतकऱ्यांना पिकांचे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची योजना आहे.
- प्रधानमंत्री पीक विमा योजना देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे.
- देशातील कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतात.
- शेतकऱ्यांच्या पिकांचे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे शेतकरी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो ज्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- एक देश एक योजना या संकल्पनेवर प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे.
आकारण्यात येणारा विम्याचा हफ्ता
प्रधान मंत्री पीक विमा योजना हि एक विमा योजना असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा आकारण्यात येतो ज्याचा प्रीमियम अत्यंत कमी प्रमाणात असतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी 2 टक्के प्रीमियम व रब्बी पिकासाठी 1.5 टक्के प्रीमियम भरावा लागतो. या योजनेअंतर्गत प्रीमियम राशी कमी प्रमाणात ठेवण्यात आली आहे ज्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होते.
खरिफ हंगामासाठी | 2 टक्के |
रब्बी हंगामासाठी | 1.5 टक्के |
खरिफ व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी | 5 टक्के |
पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल
पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यामुळे येणारी घट. पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान भरपाई- अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी
हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
काढणी पश्चात नुकसान
चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. सदरचे नुकसान काढणी, कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती
या योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीस नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे. PMFBY योजना व्यापारी व बागायती पिकांनाही विमा संरक्षण देते. मात्र यासाठी शेतकऱ्यांना पाच टक्के प्रीमियम (रक्कम) भरावी लागणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) या योजनेचे संचालन करते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीसाठी समाविष्ट कारणे
- पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.
- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
- नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी नंतरचे नुकसान
- पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
- वन्य प्राण्यांचा हल्ला
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट पिके
- अन्न पीक
- तेल बिया
- वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिके
- बारमाही फलोत्पादन/व्यावसायिक पिके
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी
- देशातील सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी आहेत.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
- राज्यातील सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेचे लाभार्थी आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ
- नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्ती, रोग आणि किडींपासून होणाऱ्या पिक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळते.
- कमी प्रीमियम: शेतकऱ्यांना विमा हप्ता कमी दरात भरावा लागतो. सरकार आणि विमा कंपन्या प्रीमियमच्या मोठ्या भागाचे वित्तपोषण करतात.
- विविध पिकांसाठी विमा: विविध प्रकारच्या पिकांसाठी विमा उपलब्ध आहे.
- त्वरित दावे: विमा दावे त्वरित आणि पारदर्शकपणे निकाली काढले जातात.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रीमियमची रक्कम
पिकांची नावे | प्रति हेक्टर प्रीमियमची रक्कम |
गहू | 11000.90/- रुपये |
बार्ली | 661.62/- रुपये |
मोहरी | 681.09/- रुपये |
हरभरा | 505.95/- रुपये |
सूर्यफूल | 661.62/- रुपये |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी मिळणारी विम्याची रक्कम
पिकांची नावे | प्रति हेक्टर विम्याची रक्कम |
गहू | 67460/- रुपये |
बार्ली | 44108/- रुपये |
मोहरी | 45405/- रुपये |
हरभरा | 33730/- रुपये |
सूर्यफूल | 44108/- रुपये |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रीमियम रक्कम
पिकांची नावे | प्रति हेक्टर प्रीमियमची रक्कम |
तांदूळ | 713.99/- रुपये |
मका | 356.99/- रुपये |
बाजरी | 335.99/- रुपये |
कापूस | 1732.50/- रुपये |
गहू | 409.50/- रुपये |
बार्ली | 267.75/- रुपये |
हरभरा | 204.75/- रुपये |
मोहरी | 275.63/- रुपये |
सूर्यफूल | 267.75/- रुपये |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य
पिकांची नावे | प्रति हेक्टर विमा रक्कम |
तांदूळ | 35699.78/- रुपये |
मका | 17849.89/- रुपये |
बाजरी | 16799.33/- रुपये |
कापूस | 34650.02/- रुपये |
गहू | 27300.12/- रुपये |
बार्ली | 17849.89/- रुपये |
हरभरा | 13650.06/- रुपये |
मोहरी | 18375.17/- रुपये |
सूर्यफूल | 17849.89/- रुपये |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अटी
- प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शासनाच्या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
- कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना बंधनकारक आहे व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
- केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
- मानवनिर्मित आपत्ती उदा.आग लागणे, चोरी होणे या बाबी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट नाहीत.
- अर्जदार शेतकऱ्याने या आधी केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत लाभ घेतला असता कामा नये.
- अधिसूचनेपूर्वी बँकेकडून विमा हप्ता जमा न करणे किंवा कपात न करता केवळ पीक कर्जाची मजूरी / वितरण केल्यास संबंधित शेतकरी विमा जोखिमेच्या सरक्षणास पात्र होणार नाही.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. उबरठा उत्पादन हे एक वर्ष कालावधी करिता असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या एक वर्ष कालावधी करिता असेल.
- सदर विमा संरक्षणाची बाब ही विमा अधिसूचित क्षेत्रातील फक्त मुख्य पिकांना लागू राहील. विमा अधिसूचित क्षेत्रावर मुख्य पीक निश्चित करतांना जिल्हा/तालुका स्तरावरील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी (Gross cropped area) किमान 25% पेरणी क्षेत्र हे हंगामातील त्या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक राहील.
- संबंधित जिल्हाधिकारी यांचे मार्फत बाधित क्षेत्राचा अहवाल, अंदाजित पेरणी क्षेत्राचा अहवाल व अधिसुचना जाहीर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल.
- संबंधीत जिल्हाधिकारी यानी योजनेतील सहभागाच्या अंतिम तारखेनंतर 15 दिवसाच्या आत परंतु अधिसूचित पीक वेळापत्रकानुसार पिकाचे पेरणीच्या अंतिम तारखेच्या एक महिन्यापर्यंतच्या मर्यादेत सदर जोखमीबाबत अधिसुचना जाहीर करणे आवश्यक असेल.
- शासनाकडून विमा अनुदानाचा प्रथम हप्ता प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात येईल.
- सदर जोखमी अंतर्गत बाधित अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकाला नुकसान भरपाई देय झाल्यानंतर सदर पिकासाठी विमा संरक्षण संपुष्टात येईल व सदरचे अधिसुचित क्षेत्र / पीक हे हंगामाच्या शेवटी उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहणार नाही.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी पुरावा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खात्याची माहिती
- 7/12 उतारा
- शेतात पिकाची पेरणी झाली असल्याचा पुरावा (पीक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक याचे पत्र सादर करू शकतो)
- शेतकऱ्याने शेत कसायला घेतले असल्यास पिकाची पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी त्या करारामध्ये शेताचा 7/12 उतारा / खासरा नुंबर असावा.
- बँकेचा रद्द केलेला चेक
- शपथपत्र
- घोषणापत्र
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पध्दत
- योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची सुचना विमा कपनी, संबधीत बँक, कृषि / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमाकाद्वारे देण्यात यावी. सर्वप्रथम केंद्रीय टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्यात यावा.
- केंद्रीय टोल फ्री क्रमांक वरून सदर सूचना संबंधित विमा कंपनीस पुढील 48 तासात पाठवण्यात येईल. केंद्रीय टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक / कृषि व महसूल विभाग यांना दयावी तसेच सदर माहिती विमा कंपनीस तात्काळ देण्यात यावी, बँकेमार्फत विमा संरक्षित बाबी जसे पीक विमा सरक्षित रक्कम भरलेला विमा हप्ता व त्याचा दिनाक या बाबी तपासून सबंधीत विमा कंपनीस सर्वेक्षणाकरिता कार्यवाही सुरू करण्यासाठी पाठविल्या जातील.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता खरीप पिकासाठी 2 टक्के प्रीमियम व रब्बी पिकासाठी 1.5 टक्के ठेवण्यात आला आहे.
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मोबाईल फोन चा वापर करून पिकांच्या नुकसानीचे मोजमाप केले जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत निर्धारित वेळेत दावे निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देता येईल.
- या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
- शेतीचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी ड्रोन व मोबाईल मॅपिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळू शकेल.
- देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव करून शकणार आहे.
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2022-23 सालापर्यंत देशातील 50 टक्के शेतकऱ्याच्या पिकांचा विमा उतरवण्याचे लक्ष निर्धारित केले गेले आहे त्यामुळे केंद्र शासनास दरवर्षी अंदाजे 8 हजार कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
जर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अर्ज केला असेल आणि तुमच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास तुम्हाला विम्याचा दावा करायचा असेल, तर तुम्हाला नैसर्गिक आपत्तींची माहिती विमा कंपनीला द्यावी लागेल. आपण ही माहिती वेळेवर विमा कंपनीला प्रदान करणे आवश्यक आहे. विमा कंपनीला आपत्ती कळवण्यास उशीर केल्यास तुम्हाला दाव्याची रक्कम दिली जाणार नाही. लहान-मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये गारपीट, भूस्खलन, अतिवृष्टी, ढगफुटी, नैसर्गिक आग आणि अवेळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांचा समावेश होतो. नुकतेच 9,30,000 शेतकऱ्यांचे विमा दावे रद्द करण्यात आले आहेत. कारण त्याने नैसर्गिक आपत्तीची माहिती विमा कंपनीला वेळेत दिली नाही.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- शेतकऱ्याने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत पिकांची नुकसान भरपाई मिळवली असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- शेतकऱ्याने अर्जात चुकीची व खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- शेतकऱ्याने दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- शेतकरी अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Farmer Corner वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Login For Farmer वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Don’t Have registered Mobile No वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून Create User बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो भरून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम जवळच्या विमा कंपनीकडे जावे लागेल.
- आता तुम्हाला कृषी विभागाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज मिळवावा लागेल.
- यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व महत्वाची माहिती जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी टाकावे लागतील.
- आता तुम्हाला अर्जासोबत सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील.
- यानंतर तुम्हाला हा अर्ज कृषी विभागाकडे जमा करावा लागेल.
- आता तुम्हाला प्रीमियमची रक्कम भरावी लागेल.
- यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल तुम्ही हा संदर्भ क्रमांक जवळ ठेवावा.या क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रीमियम रक्कम जाणून घेण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Insurance Premium Calculator वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (Season,Year,Scheme,State,District,Crop,Area) भरायची आहे व Calculate बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या प्रीमियमची रक्कम तुमच्या मोबाईल वर दिसेल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत टोल फ्री नंबर जाणून घेण्याची पद्धत
- जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास
- सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Report Crop Loss बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यांच्या तुम्हाला Toll Free Number दिसतात.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दावा करण्याची पद्धत
- जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून विम्याच्या रकमेचा दावा करू शकता.
- सर्वप्रथम, शेतकऱ्याला पिकाच्या नुकसानीची माहिती विमा कंपनी, बँक किंवा राज्य सरकारच्या अधिकाऱ्याला द्यावी लागेल.
- टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नुकसान झाल्याच्या 72 तासांच्या आत शेतकऱ्याला ही माहिती द्यावी लागेल.
- जर तुम्ही विमा कंपनी व्यतिरिक्त इतर कोणाला तरी नुकसानाची तक्रार केली असेल, तर तुम्ही खात्री केली पाहिजे की त्यांनी ही माहिती लवकरात लवकर विमा कंपनीला कळवली आहे.
- ही माहिती विमा कंपनीपर्यंत पोहोचताच, विमा कंपनी 72 तासांच्या आत तोटा मूल्यांकनकर्ता नियुक्त करेल.
- पुढील 10 दिवसांत पिकाच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करूनच नुकसान निश्चित केले जाईल.
- ही सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, विम्याची रक्कम 15 दिवसांच्या आत तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्जाची स्थिती जाऊन घेण्याची पद्धत
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Application Status वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाची Reciept Number टाकायची आहे आणि Check Status बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या स्क्रीन वर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तक्रार दाखल करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Technical Grievance वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची तक्रार दाखल करायची आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची तक्रार दाखल केली जाईल.
Telegram Group | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
help[dot]agri-insurance[at]gov[dot]in |