राज्यात बहुसंख्य कुटुंब गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे अशा परिवारातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण करता येत नाही. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते व त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाद्वारे Pandit Dindayal Swayam Yojana ची सुरवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत राज्यातील उच्च शिक्षण घेऊ इच्छित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, भोजन आणि निवास सुविधा पुरविण्यात येते.
राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या घरापासून दुसऱ्या शहरात जावे लागते लागते राज्यात वसतिगृहांपेक्षा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षणासोबत राहण्याची सोय नसते तसेच त्यांना भोजनाची सुविधा उपलब्ध नसते तसेच उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च त्यांना परवडणारा नसतो परिणामी त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते या सर्व कारणांमुळे अनुसूचित जाती/जमाती च्या विद्यार्थ्यांना Soyam Maha DBT Yojana च्या माध्यमातून उच्च शिक्षणाकरिता, भोजन, निवास व शैक्षणिक खर्चासाठी थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केला जातो.
आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता राज्यात एकूण 495 वसतीगृहे मंजुर असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता 61070 इतकी आहे. त्यापैकी 491 शासकीय वसतीगृहे कार्यरत असून त्यापैकी 283 वसतीगृहे ही मुलांची व 208 वसतीगृहे ही मुलींची आहेत, या वसतीगृहांची क्षमता 58495 इतकी आहे. राज्यात विविध ठिकाणी महाविद्यालये, उच्च महाविद्यालये, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आय.टी.आय, अल्प मुदतीचे कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम इत्यादिंची सोय झाली आहे. सदर उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदर विद्यार्थी ग्रामीण तसेच दुर्गम क्षेत्रातून तालुक्याच्या/ जिल्ह्याच्या/ विभागीय मुख्यालय/ महानगरांच्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. मात्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या ठिकाणी निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने त्यांना अशा सुविधा मोफत पुरविण्यासाठी विभागांतर्गत शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्यात येतो.
मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने शासकीय वसतिगृहांतील उपलब्ध प्रवेश क्षमता कमी पडत आहे. मागील 3 शैक्षणिक वर्षामध्ये वसतीगृह प्रवेशासाठी सरासरी 75000 अर्ज प्राप्त होत आहेत. याप्रकरणी विभागाच्या कार्यान्वित वसतीगृहांची प्रवेश क्षमता 58495 असल्याने वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृह प्रवेशासाठी विविध लोकप्रतिनीधी, विविध विद्यार्थी संघटना तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून नवीन वसतीगृहे मंजूर करण्याबाबत तसेच वसतीगृहांची प्रवेश क्षमता वाढविण्याबाबत सतत मागणी होत आहे. तथापि, नवीन वसतीगृहे मंजूर करणे, वसतीगृह प्रवेशाच्या क्षमतेत वाढ करणे, त्याकरिता भाड्याच्या इमारती शोधणे तसेच नवीन कर्मचारी नियुक्ती करणे इत्यादी बाबींकरिता होणारा विलंब तसेच राज्य शासनावरील अनावर्ती भांडवली खर्च टाळण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करूनही प्रवेश न मिळणान्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी थेट रक्कम वितरण करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
योजनेचे नाव | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojna |
विभाग | सामाजिक न्याय व कल्याण विभाग |
लाभ | विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे उद्दिष्ट
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक व मागास वर्गांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे आहे जेणेकरून विद्यार्थी उच्च शिक्षा घेऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतील.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
- राज्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढविणे.]
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
योजनेअंतर्गत खालील 3 प्रकारे वर्गीकरण केलेल्या शहरांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या तथापि शासकीय वसतिगृहात प्रवेश नसलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येईल.
क्र | खर्चाची बाब | मुंबई शहर,मुंबई उपनगर, नवी मुंबई,ठाणे,पुणे, पिंपरी-चिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर महसूल विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर जिल्ह्यांचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम |
१ | भोजन भत्ता | 32,000/- रुपये | 28,000/- रुपये | 25,000/- रुपये |
२ | निवास भत्ता | 20,000/- रुपये | 15,000/- रुपये | 12,000/- रुपये |
३ | निर्वाह भत्ता | 8,000/- रुपये | 8,000/- रुपये | 6,000/- रुपये |
प्रति विद्यार्थीं एकूण संभाव्य वार्षिक खर्च | 60,000/- रुपये | 51,000/- रुपये | 43,000/- रुपये |
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास वर्गातील विद्यार्थी
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना होणारा फायदा:
- राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
- विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून स्वतःचा उद्योग सुरु करू शकतील व राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील
- विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनेल.
- राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांचा विकास होईल.
Online Form Last Date
- पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ची शेवट ची तारीख प्रत्येक वर्षी वेगळी असू शकते. व शेवट ची तारिक शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केली जाते.
योजनेअंतर्गत समाविष्ट शैक्षणिक अभ्यासक्रम:
- उच्च महाविद्यालये
- वैद्यकीय महाविद्यालये
- अभियांत्रिकी महाविद्यालये
- आय.टी.आय.
- तंत्रनिकेतन
- अप्लमुदतीचे कौशल्यवरील आधारित अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
योजनेअंतर्गत शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी:
- विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर (Upload ) करावी.
- विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.
- मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.
- ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना सदर नाव हे आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत असावे.
- वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.
- ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.
- अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.
टीप – वरील रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी रोख स्वरूपात देण्यात येईल.
- Dindayal Upadhyay Swayam Yojana च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण करता येईल.
- राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
- या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याला त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभ दिला जाईल.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासी जमात व इतर मागास वर्ग जातीचा असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याने अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- इतर वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- विद्यार्थ्याने ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे ती शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या घरापासून दूर म्हणजे दुसऱ्या शहरात असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थी ज्या शहरात राहतो त्याच शहरातील शिक्षण संस्थेत जर विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने ज्या शहरातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे त्याच शहरात विद्यार्थ्यांला राहणे बंधनकारक आहे.
- इतर राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कारण इयत्ता 12वी उत्तीर्ण झाल्यानंतरच उच्च शिक्षणासाठी सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
- पोस्ट मॅट्रिक शिक्षणासाठीच या योजनेचा लाभ घेता येईल.
- 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- एका विद्यार्थ्याला फक्त एकदाच आणि एकाच शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभ दिला जाईल.
- विद्यार्थ्याने सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची शालेय संस्थेमध्ये / महाविद्यालयामध्ये 80 टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे.
- या योजनेसाठी निवड करताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
- विद्यार्थ्याने एखाद्या कारणामुळे शिक्षण सोडल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- संस्थेने / महाविद्यालयाने एखाद्या कारणामुळे विद्यार्थ्यास शाळेमधून काढून टाकल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- जर लाभार्थी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत असेल आणि अशी बाब सरकारच्या निदर्शनात आल्यास विद्यार्थ्याला सदर योजनेमधून रद्द करण्यात येईल.
- एका विद्यार्थाला जास्तीत जास्त 7 वर्षे या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला ऑनलाईन अर्ज करने आवश्यक आहे.
- लाभार्थी विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक काळात नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा जर अशी बाब सरकारच्या निदर्शनात आल्यास त्याला या योजनेमधून रद्द करण्यात येईल व कायदेशीर कारवाही करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि आदिवासी वर्गातील अपंग विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.
- विद्यार्थ्या मागील वर्षात 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- जर विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमा दरम्यान अनुत्तीर्ण झाला तर त्याला त्या वर्षासाठी लाभ दिला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- विद्यार्थी अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- बोनाफाईड
- इयत्ता 10वी, इयत्ता 12वी उत्तीर्ण मार्कशीट
Online New Registration Process:
- अर्जदार विध्यार्थ्याला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Registration वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली माहिती (Aadhaar Number, Name as par aadhaar, Date of Birth, Gender, Mobile Number, Password, Confirm Passwrod) भरावयाची आहे.सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
Login Process:
- अर्जदाराला पोर्टल च्या होम पेज वर जायचे आहे.
- होम पेज वर तुमच्या Login ID आणि Password ने लॉगिन करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल
Online Application Process:
- अर्जदार विध्यार्थ्याला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर तुमच्या Login ID आणि Password ने लॉगिन करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती (Applicant Nume, Gender, Aadhaar Number, Date of Birth, Age, Father Name, Mother Name, Annual Income, Address, State, District, Taluka, Village) भरावयाची आहे सर्व माहिती भरून झाल्यावर Proceed बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचा तपशील व पत्ता भरायचा आहे.
- आता तुम्हाला मागील वर्षात दिलेल्या परीक्षेचे तपशील व माध्यमिक शालांत परीक्षा तपशील (School Name, Address of School, Name of Course, Course Duration, Marks, Total Marks, Percentage, Examination Result) व माध्यमिक शाळांत परीक्षा तपशील (Board, District Board, Year of Passing, Passing Month, SSC Seat Number) भरावयाचे आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
संपर्क ई-मेल | [email protected] |
संपर्क क्रमांक | 0253-2992946 |
Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana PDF | Click Here |
Pandit Dindayal Yojana Online Form Maharashtra | Click Here |
Telegram Channel | Click Here |