राज्यात बहुतांश युवक सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे ते नोकरीच्या शोधात असतात परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार. आवडीनुसार तसेच योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. तसेच बहुतांश युवक नोकरी मिळत नसल्यामुळे स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना बँक व वित्त संस्था कर्ज देण्यासाठी उत्सुक नसतात त्यामुळे ते स्वतःचा उद्योग सुरु करण्यापासून वंचित राहतात या सर्व गोष्टींचा त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजना अंतर्गत राज्यातील जे तरुण इयत्ता 10वी, इयत्ता 12वी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत अशा तरुणांना त्याच्या शिक्षणानुसार, आवडीनुसार तसेच योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध करून दिली जाते.
योजनेचे नाव | Pandit Dindayal Upadhyay Rojgar Yojana |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील तरुण / तरुणी |
लाभ | नोकरीची संधी |
उद्देश | बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुण / तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणे.
- राज्यातून बेरोजगार कमी करणे
- राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे
योजनेचे वैशिष्ट्य:
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
- राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
- राज्यात बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- बेरोजगार तरुणांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुणांनाच योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील तरुणांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- योजनेअंतर्गत अर्ज केल्यापासून नोकरी मिळेपर्यंत अर्जदारास कुठल्याही प्रकारचा बेरोजगारी भत्ता दिला जाणार नाही.
- अर्जदार किमान इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी अर्जदार बेरोजगार असणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत:
पहिले चरण
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर तुम्हाला नोंदणी या बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर समोर New Jobseeker Registration असे पेज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमची (आधारकार्ड प्रमाणे) सर्व माहिती भरायची आहे.
- पहिले नाव
- आडनाव
- मधले नाव (आधार कार्डवर असल्यास टाकावे)
- जन्मतारीख
- लिंग
- आधार क्रमांक
- मोबाईल क्रमांक
- Captcha
- अशी सर्व माहिती भरून Next बटनावर क्लिक करावे.
- Next बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला OTP क्रमांक विचारला जाईल त्यामध्ये तुमच्या मोबाईलवर जो मेसेज आला असेल त्यामधील OTP टाकावा.
- OTP टाकून झाल्यावर Confirm बटनावर क्लिक करावे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- आईचे नाव
- देश
- राज्य
- जिल्हा
- तालुका
- शहर
- मातृभाषा
- पत्ता
- पिनकोड
- राष्ट्रीयत्व
- धर्म
- वैवाहिक स्थिती
- जात प्रवर्ग
- उपजात / पोटजात निवडा
- स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का? होय / नाही
Qualification
- शैक्षणिक अर्हता गट
- स्ट्रीम (प्रवाह)
- शिक्षण
- विषय / विशेषीकरण
- पात्रता स्थिती
- स्कोअरिंग प्रकार
- उत्तीर्ण वर्ष
- टक्केवारी
- माध्यम
- संस्था / कॉलेज
- बोर्ड / विद्यापीठ
- संपर्काची माहिती
- मोबाईल क्रमांक
- दूरध्वनी क्रमांक
- इ-मेल आयडी
- सेट केलेला पासवर्ड
- सेट केलेला पासवर्ड (नवीन पासवर्ड बनवा)
- संकेतशब्द पुनः प्रविष्ट (पासवर्ड पुनः टाका)
- खाते तयार करा बटनावर क्लिक करा
- अशा प्रकारे तुम्हाला महारोजगार सोबत रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मेसेज आणि ईमेल येईल ज्यामध्ये तुम्हाला रेजिस्ट्रेशन आयडी देण्यात येईल.
दुसरे चरण:
- आता तुम्हाला होमपेज वर यायचे आहे
- होमपेज वर आल्यावर तुम्हाला नोकरीच्छुक उमेदवार लॉग इन मध्ये तुमचा आधार क्रमांक किंवा रेजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायच आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल
लक्षात ठेवा: माहिती भरण्यासाठी Edit बटनावर क्लिक करायच आहे आणि माहिती भरून झाल्यावर जोडा बटनावर क्लिक करायच आहे.
- तसेच तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती,
- तुम्हाला या आधी असलेला एखादा कामाचा अनुभव,
- इतर तपशील,
- इतर कोणता कोर्स केला आहे का?
- तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात का?
- प्रकल्पग्रस्त आहात का?
- भूकंपग्रस्त आहात का?
- इत्यादी माहिती योग्य प्रकारे भरून तुम्हाला तुमची Profile update करायची आहे.
तिसरे चरण:
नोकरी कशी शोधावी / अर्ज कसा करावा
- Profile Page वर डाव्या बाजूला तुम्हाला Pandit Dindayal Upadhyay Job Fair दिसेल त्यावर क्लिक करावे.
- आता District list मधून तुमचा जिल्हा निवडा आणि Filter बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर सर्व Vaccancy ची list दिसेल त्यामध्ये Action कॉलम मध्ये Vaccancy Listing बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुमचा जिल्हा निवडा आणि त्या खाली दिलेल्या Search बटनावर क्लिक करा.
- आता तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सर्व नोकऱ्या तुम्हाला दिसतील त्या लिस्ट मधून तुम्ही इच्छुक नोकरीसाठी Apply बटनावर क्लिक करून Apply करू शकता.
- Apply केल्यानंतर तुमच्या ई-मेल वर तुम्हाला तुम्ही Apply केलेल्या नोकरीसंदर्भात Interview बद्दल कळविण्यात येईल.
Telegram Group | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |