महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे तसेच मुलींमध्ये योग्य बदल घडवून आणणे या उद्देशाने दिनांक 1 जानेवारी 2014 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात बहुतांश कुटुंबे हि दारिद्रय रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे स्वतःच्या मुलींना योग्य शिक्षण देणे त्यांना शक्य होत नाही. तसेच आपल्या देशात मुलींना कमी महत्त्व दिले जाते त्यामुळे भ्रूणहत्येचे प्रमाण वाढते तसेच मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते असे नकारात्मक विचारांना बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना ची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे.
योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती |
योजनेची सुरुवात | 1 जानेवारी 2014 |
विभाग | बाल विकास विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
योजनेचा उद्देश | मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
- राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मातेच्या गर्भधारणेच्या वेळी लिंग निवडिस प्रतिबंध करणे.
- बालिका भ्रूणहत्येला रोखणे.
- बालिका भ्रूणहत्येला प्रतिबंधक करून मुलीचा जन्मदर वाढविणे.
- मुलींचे कमी वयात लग्न म्हणजेच बालविवाहास प्रतिबंध करणे.
- मुलीच्या चांगल्या जीवनात्मक सुरक्षेबद्दल खात्री देणे.
- मुलींना चांगले शिक्षण प्रदान करणे.
- मुलींच्या आरोग्याकडे भर देणे व त्यात सुधारणा करणे.
- मुलींना शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे.
- मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे
- मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.
- मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना आरोग्य शिक्षण देणे जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
- महाराष्ट्र राज्यामध्ये मुलीचे शिक्षण आरोग्य यामध्ये सुधारणा करणे.
- मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत शासनाकडून मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
- या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, मुलींना चांगले शिक्षण देणे व मुलींच्या बालविवाह प्रतिबंध करणे या गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
योजनेचे लाभार्थी
योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे 2 प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
प्रकार – 1 चे लाभार्थीं | एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. |
प्रकार – 2 चे लाभार्थी | एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार 2 चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ दिला जाणार नाही. |
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र बद्दल माहिती
योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत.
टप्पा 1: मुलीच्या जन्माच्या वेळी
- हेतू: मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी
- अट: मुलीची जन्म नोंदणी करणे आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी: 5,000/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: 2,500/- रुपये - योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे 1 लाख रुपये अपघात विमा व 5,000/- रुपये पर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल.
- मुलीच्या नावावर शासनामार्फत | एल.आय.सी. कडे 21,200/- चा विमा | उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रु.१ लाख विम्याची रक्कम देण्यात येईल.
- आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नांवे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus | 21,200/- रुपये) नाममात्र रुपये 100/- रुपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल. ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील.
अ) नैसर्गिक मृत्यू : 30,000/- रुपये
आ) अपघातामुळे मृत्यू : 75,000/- रुपये
इ) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास : 75,000/- रुपये
ई) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास: 37,500/- रुपये
उ) आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत सदर मुलीला रुपये 600/- इतकी शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल.
टप्पा 2: मुलगी 5 वर्षे वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी
- हेतू: दर्जेदार पोषण देण्यासाठी दर दिवशी 1 अंडे किंवा दर दिवशी 200 मी.ली.दूध दिले जाईल
- अट: मुलगी जन्मल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी 200/- रुपयांप्रमाणे प्रमाणे 5 वर्षांकरिता एकूण 10,000/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी 1,000/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता 10,000/- रुपये
टप्पा 3: प्राथमिक शाळेत प्रवेश (इयत्ता 1ली ते 5वी)
- हेतू: गुणवत्तापूर्वक पोषण आहार व इतर खर्चाकरिता
- अट: मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक
- लाभ
पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी 2,500/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता एकूण 12,500/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी 1,500/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता 15,000/- रुपये.
टप्पा 4: माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इयत्ता 6वी ते 12वी)
- हेतू: गुणवत्तापूर्वक पोषण आहार व इतर खर्चांकरिता
- अट: मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी 3,000/- रुपयांप्रमाणे 7 वर्षांकरिता एकूण 21,000/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी 2,000/- रुपयांप्रमाणे 7 वर्षांकरिता 22,000/- रुपये
टप्पा 5: वयाच्या 18व्या वर्षी
- हेतू: कौशल्य, विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी
- अट: वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक व अविवाहित असल्याबाबतचे पालकांचे शपथपत्र
- लाभ: विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये देण्यात येतील.त्यापैकी किमान 10,000/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे.
टप्पा 6: मुलीचा जन्म झाल्यानंतर
- हेतू: आजी आजोबाला प्रोत्साहनपर भेट
- अट: पहिल्या मुली नंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक
- लाभ:
पहिल्या मुलींसाठी : सोन्याचे नाणे देण्यात येईल. (5,000/- रुपये कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र)
दुसऱ्या मुलींसाठी: लागू नाही.
टप्पा 7: गावाचा गौरव
- हेतू: मुलामुलींचे विषम असलेले गुणोत्तर 1,000 पेक्षा जास्त असण्यासाठी प्रोत्सहानपर
- अट: जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचे प्रमाणपत्र तसेच सदरची रक्कम गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक राहील.
- लाभ: ग्रामपंचायतीस 5 लाख इतके पारितोषिक मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मातेने / पित्याने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ फक्त 1 ऑगस्ट 2017 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठीच असेल.
- 1 ऑगस्ट 2017 पूर्वी जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जर एखाद्या आई-वडिलांना पहिली मुलगी असेल व दुसरा मुलगा असेल किंवा पहिला मुलगा व दुसरी मुलगी असेल आणि त्यांचा जन्म जरी 1 ऑगस्ट 2017 नंतर झाला असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जर एखाद्या कुटुंबात पहिले अपत्य मुलगी व दुसरे अपत्य मुलगी असेल आणि जर तिसरे अपत्य मुलगी झाली असेल तर त्या तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही उलट पहिल्या व दुसऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ रद्द करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त 2 मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- लाभार्थ्याचे वडील महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
- मुदत ठेव रक्कम व त्यावरील जमा व्याजाची रक्कम मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच काढता येईल परंतु लाभार्थी मुलगी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसुती वेळेस जर मातेने जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्या दोन्ही जुळ्या मुली सदर योजनेसाठी पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुली देखील सदर योजनेसाठी पात्र असतील.
- जर एखाद्या कुटुंबाने एखादी मुलगी दत्तक घेतली असेल तर ती मुलगी देखील सदर योजनेचा लाभ घेऊ शकेल परंतु दत्तक घेतलेल्या मुलीचे वय 0 ते 6 वर्षे इतके असावे तसेच दत्तक घेतलेल्या मुलीच्या पालकांना देखील सदर योजनेचे नियम व अटी लागू असतील.
- सदर योजना आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येईल.
- मुदतीपूर्वी म्हणजेच मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले किंवा मुलगी दहावीत नापास झाली किंवा एखाद्या कारणामुळे मुलीचे नाव शाळेमधून काढून टाकण्यात आले तर अशा परिस्थितीत सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांस घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या मुलीचा मृत्यू जर एखाद्या नैसर्गिक कारणामुळे झाल्यास मुलीच्या नावावरील पूर्ण रक्कम मुदत संपल्यानंतर पालकांना देण्यात येईल.
- प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल.
- मुलीच्या नावे मुदत ठेव रक्कम जमा झाल्यावर लाभार्थ्यास बँकेकडून गुंतवणूक प्रमाणपत्र देण्यात येईल.
- मुदत ठेव पद्धतीवरील व्याज बँकेच्या दरानुसार देण्यात येईल.
- पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत आई-वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे या योजनेअंतर्गत बंधनकारक राहील जर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया 1 वर्षानंतर केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सदर योजना सर्व गटातील कुटुंबातील फक्त २ मुलींना लागू असेल.
- दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर, 6 महिन्याच्या आत मुलीच्या आई-वडिलांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.
- अर्ज करतेवेळी मुलीचे जन्म प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- सदर योजनेअंतर्गत मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर LIC कडून जे 1 लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी किमान 10,000/- रुपये तरी मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरून या कौशल्याच्या मदतीने मुलीला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक (Domicile certificate)
- मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र (शाळेचा दाखला, जन्माचा दाखला)
- लाभार्थी कुटुंबाने जर पहिल्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत आई / वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
- लाभार्थी कुटुंबाने जर दुसऱ्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत आई-वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलीचे आधार कार्ड
- सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- वीज बील
- रहिवासी पत्ता प्रमाणपत्र
- मोबाइल क्रमांक
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 7.5 लाखाच्या आत असणे आवश्यक)
- पासपोर्ट आकाराचे फोटो
योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:
- अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी नसल्यास
- अर्ज करण्यापूर्वी मुलीच्या आई/वडिलांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया न केल्यास
- मुलीचा जन्म 1 ऑगस्ट 2017 पूर्वी झाला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- कुटुंबातील दुसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही व अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाखापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- सदर योजनेअंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंब नियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैदयकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत.
- सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
- सदर अर्जाची छाननी अंगणवाडी सेविका करतात आणि अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका / मुख्यसेविकेकडे सादर करतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका सदर अर्जाची व प्रमाणत्रांची तपासणी करुन प्रत्येक नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकायांना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज | येथे क्लिक करा |
पालकांचे स्वयंघोषणापत्र / हमीपत्र | येथे क्लिक करा |
बालगृहे, शिशुगृहे किंवा महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर निवासी संस्था येथील अधिकारी व जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्ज | येथे क्लिक करा. |
योजनेबद्दल संपूर्ण माहिती | येथे क्लिक करा |
Telegram Group | Join |