महिला सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ज्यामुळे महिला तिकिटांच्या 50 टक्के दरात राज्यात प्रवास करू शकतात.
महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. 17 मार्च 2023 पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | महिला सन्मान योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | 17 मार्च 2023 |
विभाग | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ |
लाभ | राज्यातील महिलांना एस ती च्या तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
उद्देश | महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज करण्याची आवश्यकता नाही |
महिला सन्मान योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील महिलांना तसेच सर्व नागरिकांना एस टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित तसेच प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महिला सन्मान योजना महाराष्ट्र ची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील महिलांना समाजात मनाचे स्थान मिळवून देणे.
योजनेचे वैशिष्टय:
- राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
- महिला सन्मान योजना महाराष्ट्र ची महत्वाची बाब अशी आहे कि या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जाती धर्मातील महिला घेऊ शकतात त्यासाठी त्यांना कुठल्याच प्रकारची प्रवर्गाची अट ठेवण्यात आली नाही आहे.
एसटीच्या खालील गाड्यांत महिलांना सवलत दिली जाणार आहे:
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ( साधी बस, रातराणी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत), अश्वमेध ) 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच भविष्यात पुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये देखील ही सवलत मिळणार आहे.
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत अनुज्ञेय करणे बाबत निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
- सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी /मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी ] बसेसमध्ये 50% सवलत दि. 17 मार्च 2023 पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे.
- सदरची सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील.
- सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना या नावाने संबोधण्यात येत आहे.
- सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे.
- सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.
- ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना 50% सवलतीचा परतावा देण्यात येणार नाही.
- सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येणार नाही.
- सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अँपद्वारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात येईल.
- सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत दिली असल्याने 50% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येईल.
- 75 वर्षावरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार 100% सवलत अनुज्ञेय राहिल.
- 65 ते 75 या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय राहिल.
- 5 ते 12 या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50% सवलत अनुज्ञेय राहिल.
योजनेचे लाभार्थी
- राज्यातील सर्व महिला महिला सन्मान योजना महाराष्ट्र चा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- महिला सन्मान योजना महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येते.
- राज्यातील महिला तसेच इतर प्रवाशी एस टी ने प्रवास करण्यासाठी आकर्षित होतील.
- 50 टक्के सवलत मिळवून महिला राज्यभर प्रवास करू शकतील.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत महिलांना एस टी प्रवासासाठी 10 टक्के सवलत दिली जाणार नाही महिलांना तिकीटाची किमान 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
- फक्त 75 वर्षावरील महिलांनाच तिकीट दरात 100 टक्के सवलत देण्यात येईल.
- सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय राहील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील प्रवासासाठी सदर योजना लागू नाही.
- सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय नाही.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना कुठल्याच कागदपत्रांची आवश्यकता नाही.
- 75 वर्षांवरील महिलांना त्यांचे आधार कार्ड किंवा जेष्ठ नागरिक कार्ड प्रवासादरम्यान सोबत ठेवणे आवश्यक आहे.