Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 3 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील जात, धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती  प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह करतात तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना 50,000/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. या योजनेअंतर्गत दिली जाणारी 50% रक्कम केंद्र सरकार आणि 50% रक्कम राज्य शासनाकडून दिली जाते.

तसेच आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते.

आपल्या देशात अजूनही काही भागात जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. तसेच समाजात आंतरजातीय विवाहाबद्दल अजून सुद्धा खूप साऱ्या चुकीच्या समजुती \लोकांच्या मनात आहेत या सर्व चुकीच्या समजुतींना नष्ट करण्यासाठी व भेदभाव कमी करण्यासाठी सरकार विविध योजना सुरु करत असतात त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra
योजनेचे नाव आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ 3 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम
योजनेचा उद्देश समाजातील जात / धर्म भेदभाव नष्ट करणे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चे मुख्य उद्दिष्ट

  • जाती धर्म भेदभाव नष्ट करणे: समाजात होणारा जात, धर्म भेदभाव नष्ट करून सर्वाना समान हक्क देण्याच्या उद्देश्याने तसेच आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • गैर समज नष्ट: समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट करणे.
  • आर्थिक सहाय्य: नवं जोडप्यास आर्थिक सहाय्य करणे.
  • आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन: आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
  • प्रत्येक धर्माला समान स्थान देणे.
  • सर्वाना समान हक्क देणे.
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

योजनेचे वैशिष्ट्य:

  • जाती-जातीतील जातीयतेची तेढ कमी होऊन समानता वृद्धिंगत व्हावी तसेच सर्व जातींतील व्यक्तीमध्ये एकोपा वाढावा या उदांत दृष्टिकोनातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आंतरजातीय विवाह योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून 50,000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास दिले जातात.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून जातिगत भेदभाव कमी करून प्रत्येक धर्माला समान स्थान देणे आहे.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम DBT च्या सहाय्याने थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

सदर योजना खालील प्रकारासाठी लागू आहे:

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Inter Cast Marriage Scheme Maharashtra Information

योजनेचे लाभार्थी:

  • ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे अशी जोडपी आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चे लाभार्थी आहेत.

योजनेअंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ:

  • या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50,000/- रुपयांची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. त
  • सेच आंतरजातीय विवाह योजना अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जण म्हणजेच मुलगा किंवा मुलगी अनुसूचीत जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येते.
शासनामार्फत50,000/- रुपये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून2.5 लाख रुपये
एकूण3 लाख रुपये

अर्ज करण्याचा कालावधी:

  • विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

योजनेचा फायदा:

  • आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन: आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने राज्यातील नागरिक आतंरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहित होतील.
  • भेदभाव नष्ट होण्यास मदत: राज्यातून जाती, धर्म भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल.
  • गैर समज नष्ट होण्यास मदत: समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट होण्यास मदत होईल.

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • रहिवाशी: फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच आंतरजातीय विवाह योजना चा लाभ दिला जाईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • जातीची अट: लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक जण (मुलगा किंवा मुलगी) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी असावा.
  • आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत दिली जाणारी रक्कम फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांनी अनुसूचित जाति प्रवर्गातील मुलगा किंवा मुली सोबत विवाह केला आहे.
  • केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
  • वयाची अट: या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या मुलाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • विवाह प्रमाणपत्र: आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय यापैकी एक व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) व दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) हिंदू लिंगायत जैन शीख बौद्ध असल्यास हा विवाह आंतरजातीय विवाह मानण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय यामधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाह मानण्यात येईल.
  • अर्जदाराने या आधी जर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • वास्तव्य पुरावा: सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या जोडप्यापैकी वधू / वराचे कुटूंब महानगरपालिका क्षेत्रात किमान 3 वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी/ वीज बिल/ आधार कार्ड/ 3 वर्षाचा भाडे करारनामा/ पारपत्र (Pass Port)/ रेशनकार्ड / विवाह नोंदणी दाखला / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल.
  • सदर योजनेचा लाभ आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तींनाच मिळू शकेल.(अ.जा./अ.ज./भ.ज./वि.भ.ज./ई.मा.व./वि.मा.व. व यामधिल आंतर प्रवर्ग शासन निर्णयानुसार)
  • शाळा सोडल्याचा दाखला: अर्जासोबत वर व वधु यांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला: वर अथवा वधु जे मागासवर्गीय असतील त्याबाबत संबंधित सक्षम | प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचा दाखला.
  • अर्जासोबत महाराराष्ट्राचे रहीवासी असल्यास मा.जिल्हाधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • विवाह नोंदणी दाखला: अर्जासोबत विवाह नोंदणी दाखला जोडणे अनिवार्य राहील.
  • फोटो: अर्जासोबत दोघांचे अलीकडील काळात काढलेले पासपोर्ट साईज | आकाराचे फोटो लावणे आवश्यक राहील.
  • अर्जदाराने पॅनकार्डची छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने जिल्हा कार्यालय, ठाणे येथून संबंधित योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याने/स्वक्षांकित प्रमाणित केलेली असावीत.
  • दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा. आयुक्त यांना राहील.

आवश्यक कागदपत्रे:

  • विवाह दाखला: लाभार्थी विवाहित जोडप्याचा विवाह दाखला / कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र / लाभार्थ्याकडे कोर्ट मॅरेज विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लायसेन्स, पासपोर्ट
  • उत्पन्नाचा दाखला: सक्षम अधिकारी किंवा तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल
  • फोटो: पासपोर्ट आकाराचे मुला / मुलीचे फोटो / लाभार्थी वधू-वराचे एकत्रित कलर फोटो
  • जातीचा दाखला: लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील असल्याचा दाखला.
  • दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शीफारस पत्र
  • जन्म प्रमाणपत्र: जन्माचा दाखला किंवा लाभार्थी वधू-वराचा शाळा सोडल्याचा दाखला
  • बँक खात्याची माहिती: बँक खाते पासबुक झेरॉक्स (बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक)

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जात संपूर्ण माहिती न भरल्यास अर्ज रद्द होण्याची शकता आहे.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • लाभार्थ्याने अर्जात खोटी माहिती भरून लाभ घेतला असल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाईल तसेच लाभाची राशी वसूल केली जाईल.
  • विवाह आंतरजातीय नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जात बँक खाते चुकीचे भरल्यास लाभाची रक्कम जमा करण्यात येणार नाही त्यामुळे अर्जात बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे भरा..
  • अर्जात IFSC Code चुकीचा भरल्यास लाभाची रक्कम जमा होण्यास समस्या होऊ शकते.
  • एकाच वेळी 2 अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदाराने या आधी केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ प्राप्त केला असेल तर अशा परिस्थितीत सादर योजनेअंतर्गत अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यावर आंतरजातीय विवाह योजना दिसेल त्याला क्लिक करावे. क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेजवर एक रजिस्टेशन अर्ज असेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (मुलाचे संपूर्ण नाव, मुलीचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी) भरावी व योग्य ती कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा.
  • अशाप्रकारे तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपली नजीकच्या जिला कार्यालयात जायचे आहे.
  • जिला कार्यालयातून आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यायचा आहे किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत व भरलेला अर्ज जिला कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अशा प्रकारे तुमची आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिक माहितीसाठी:

  • योजनेचे नियम व अटी मध्ये शासनाकडून वेळोवेळी बदल होऊ शकतो त्यामुळे अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDFयेथे क्लिक करा
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDFयेथे क्लिक करा
संपर्क कार्यालयसंबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी
समाज कल्याण अधिकारी.
Telegram ChannelClick Here

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!