राज्यातील बहुतांश शेतकरी हे सुशिक्षित नाहीत त्यामुळे पिकांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची त्यांना माहिती नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या या समस्येचा विचार करून आम्ही ई पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत पिकांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची सर्विस्तर माहिती खाली दिलेली आहे.
E Pik Pahani Online Registration
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Google Play Store यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
- अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
- आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
- आता तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
- आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
- आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
- आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
- अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
ई पीक पाहणी कार्यक्रम: अधिक माहिती