कोव्हिड-१९ आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास आर्थिक सहाय्य देण्याचे ठरविले आहे.
या दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाथार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
त्यानुसार लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची / मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- (रु.पन्नास हजार) इतके सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. हे सहाय्य देण्याकरिता कोव्हिड-१९ मृत्यू प्रकरणे खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येतील
- RT-PCR /Molecular Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical दॆग्नोसिस कोव्हिड-१९ असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-१९ मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.
- वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या कोव्हिड-१९ प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल, जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड-१९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी.
- कोव्हिड-१९ च्या प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू झालेला असेल आणि जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड-१९ चा मृत्यू समजण्यात येईल.
- ज्या कोव्हिड-१९ च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड-१९ पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १० खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form ४ व ४A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड-१९ चा मृत्यू समजण्यात येईल.
- Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड-१९ मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील १ ते ४ मधील अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे रु. ५०,०००/ च्या सहाय्यासाठी पात्र असतील.
हे सहाय्य मिळण्याकरिता कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.
अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे/माहिती सादर करणे बंधनकारक राहील.
१) अर्जदाराचा स्वतःचा आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक
२) मृत व्यक्तीचे आधारकार्ड
3) अर्जदाराच्या बँक खात्याचे तपशील
४) जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अंतर्गत कोव्हिड-१९ मुळे मृत पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
५) अर्जदाराचे आधार कार्ड सोबत लिंक केलेले बँक खाते
६) अर्जदाराच्या खात्याचा Cancelled Cheque
७) मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
८) मृत व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे सिद्ध झाल्याचे प्रमाणपत्र ( RT-PCR Report Copy किंवा CT Scan Copy किंवा Any Other Medical Documents )
अर्ज करण्याची पद्धत
Step 1
अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईवर जावं लागेल.
वेबसाईटच्या होम पेज वर गेल्यावर अर्जदाराने स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकावा त्यानंतर अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे.
Step 2
आता तुमच्यासमोर एक अर्ज खुलेल त्यामंध्ये अर्जदाराला स्वतःची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
Add Applicant Details
- Applicant Aadhar Card Upload करायचे आहे.
- Enter Aadhar Card Number
- First Name
- Last Name
- Gender
- Date Of Birth
- Address
सर्व माहिती भरून झाल्यावर Save & Continue वर क्लिक करायचे आहे
Step 3
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला मृत रुग्णाची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
Add Decreased Details
- Name of the Decreased
- Date of death of Decreased
- Decreased Aadhar card available Yes / No
- Decreased Aadhar card Number
- Upload Decreased Aadhar Card
- Did the death occur in municipal corporation area? Yes / No
- Select District / Municipal Corporation
- Relationship with Decreased
- Upload Death Certificate
- Medical Certificate of cause of death available Yes / No
- Self Declaration
- Death Due to Covid 19 Yes / No
- Death due to sucide within 30 days of covid 19 diagnosis Yes / No
- वरील सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत
- I agree & continue वर click करून Proceed बटनावर click करावे.
Step 4
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामंध्ये तुम्हाला विचारलेली रुग्णाची अजून थोडी माहिती भरायची आहे.
Add Decresed Details
- Decresed Date Of Birth
- Death Certificate Registration Number ( Optional )
- Gender
- Full Address
- Date of Diagnosis
- Date of Death of Decreased
- Number of days between diagnosis & death
Type Of Reports
- RT-PCR Certificate: Upload
- RAT Certificate: Upload
- Clinical Diagnosis Certificate: Upload
Declaration of death is not due to ( या कारणामुळे मृत्यू झालेला नाही )
- Poisoning
- Accident
- Homicide
- Hospitalized Yes / No
- Admission Date
- Doctor Name Who Treated
- Discharge date
- Doctor Register Number ( Optional )
- Place of death
- Hospital / Dispensary name
- Report Basis
- Other Documents Name
- Other Documents Upload file ( Optional )
- Save & Continue वर click करावे.
Step 5
आता अर्जदाराचे bank Details अपलोड करायचे आहेत.
- Cheque leaf: Upload file
- Bank IFSC Code
- Enter Bank Name
- Enter Bank Branch Address
- Enter Bank Acccount Number
- Re-Enter Bank Account Number
- Save & Continue वर click करावे अशा प्रकारे तुमचा अर्ज भरून झाला आहे.
तुमच्या अर्जाची आणि सोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून महाराष्ट्र शासनाकडून बँक खात्यात सादर योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम जमा करण्यात येईल.
हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप (Automatically) स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
6. ज्या अर्जदाराकडे मृत व्यक्तीचा आधार तपशील नसेल किंवा हा आधार क्रमांक वरील नमूद Data base मध्ये उपलब्ध आधार क्रमांकाशी जुळला नाही तर अशा अर्जदाराकडे Medical Certificate of cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक / महानगर पालिका क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी निश्चित करतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येईल. हे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र तपासून त्यात कोव्हिड-१९ हे मृत्यूचे कारण त्यात नमूद असल्यास त्यास संगणकीय प्रणालीवर सहाय्य मिळणेबाबतचा हा अर्ज स्वीकृत करतील.
7. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या RT-PCR / Molecular Test / RAT Positive अहवाल अथवा रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्यांचा अहवाल तसेच इतर कोणतीही कागदपत्रे जी अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोव्हिड-१९ मुळे असल्याचा सिध्द करत असेल ती अर्जदार संगणकीय प्रणालीवर upload करतील. अर्जदाराने उपलब्ध करून दिलेली कागदपत्रे संबंधित जिल्हा शल्य विकीत्सक मार्फत / महानगर पालिका क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी यांचेकडील संबधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्याने ही प्रमाणपत्रे तपासुन हा मृत्यू कोव्हिड-१९ मुळे मृत्यू असल्याचे मान्य केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज स्वीकृत करण्यात येईल.
8. या प्रकरणी अर्जदारास काही तक्रार करावयाची असल्यास अर्जदारास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याकरिता गठीत केलेल्या जिल्हा स्तरीय / म.न.पा. स्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. या समितीचा निर्णय संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक / महानगर पालिका क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी सदर समितीच्या वतीने पोर्टलवर नमूद करतील.समितीच्या निर्णयानुसार सहाय मिळणेबाबतचा अर्ज स्वीकृत किंवा अस्वीकृत करण्यात येईल.
9. अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजूरी देईल. सर्व मंजूर प्रकरणे संगणकीय प्रणालीवर सर्वसामान्य जनतेला माहिती व सूचना / हरकतीसाठी उपलब्ध राहतील. त्यानंतर ७ दिवसांनी सदर सहाय्य अर्जदाराच्या बँक खात्यावर थेट (DBT) जमा करण्यात येईल. या दरम्यान मृत व्यक्तीच्या अन्य निकट नातेवाईकास अर्ज केलेल्या निकट नातेवाईकाबाबत काही तक्रार असल्यास संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडे तक्रार नोंदविण्याची मुभा असेल.
अशी तक्रार प्राप्त झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यक ती छाननी करुन सानुग्रह सहाय्य कोणत्या निकट नातेवाईकांना देय असतील याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.
10. या योजनेची तपशीलवार कार्यपध्दती यासाठी विकसित केलेल्या वेब पोर्टलवर दर्शविण्यात आल्याप्रमाणे असेल. हे वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत आवश्यक ती प्रसिध्दी जिल्हा / तालुका / गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करतील.
शासनाचा निर्णय: येथे क्लिक करा
शासनाची अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
सारांश
आशा करतो कि कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार या बद्दल आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.