आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र 2024

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र: पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील मागणी, विविध पत्रकार संघटना, लोकप्रतिनिधी, विधानमंडळ सदस्य यांच्याकडून शासनाकडून वारंवार करण्यात येत होती. प्रसिद्धी माध्यमे व पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या लोकोपयोगी योजना जाहीर करते त्याची व्यापक प्रचार व प्रसिद्धीचे कामकाज माध्यमे व त्यामध्ये काम करणारे पत्रकार निरपेक्ष भावनेने करीत असतात त्यामुळे अशा घटकाला सामाजिक सुरक्षा सुविधा देण्याचा विचार करून जेष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000/- रुपये इतके अर्थसहाय्य्य देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत 2018-2019 मध्ये रुपये 15 कोटी तसेच 2021-2022 मध्ये रुपये 10 कोटी असे एकूण रुपये 35 कोटी इतकी रक्कम मुंबईतील इंडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव स्वरूपात गुंतविण्यात आलेली आहे.
पत्रकारांना आर्थिक सहाय्य्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यात आली आहे

योजनेचे नावआचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकार
लाभदरमहा 11,000/- रुपये अर्थसहाय्य्य
योजनेची घोषणा02 फेब्रुवारी 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना चे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकारांना त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी दरमहा आर्थिक सहाय्य्य करणे हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
  • पत्रकारांना वृद्धावस्थेत दैनंदिन गरजांसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
  • ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान आणि त्यांच्या क्षेत्रातील सेवांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे.
v

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची वैशिष्ट्ये

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना महाराष्ट्र राज्यासाठी सुरु करण्यात आली आहे
  • योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र जेष्ठ पत्रकार घेऊ शकतात.
  • योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला शासनाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदारांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

  • योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 11,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
  • निवृत्त पत्रकारांना वैद्यकीय विमा संरक्षण देखील प्रदान केले जाते.
  • या सन्मानासाठी निवड झालेल्या जेष्ठ पत्रकारांना राज्य सरकारच्या वतीने एक सन्मानपत्र आणि शाल देण्यात येते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजना चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे लाभ

  • जेष्ठ पत्रकारांना उतारवयात सन्मानपूर्वक जीवन जगता येईल.
  • पत्रकारांना वृद्धापकाळ त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेची पात्रता

  • जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व शर्ती

  • योजनेअंतर्गत वृत्तपत्र आणि इतर वृत्तप्रसार माध्यम यांचे संपादक 30 वर्षे म्हणून काम केलेले व वय वर्षे 60 पूर्ण झालेले पत्रकार पात्र असतील
  • किमान सलग 30 वर्षे श्रमिक पत्रकार / छायाचित्रकार म्हणून सेवा करून सेवानिवृत्त झालेले व किमान 60 वर्ष वय पूर्ण झालेले पत्रकार / छायाचित्रकार या योजनेसाठी पात्र असतील.
  • किमान सलग 30 वर्षे स्वतंत्र व्यवसायाची पत्रकार / छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता / छायाचित्रकार म्हणून पत्रकारिता करून निवृत्त झालेले व किमान 60 वर्षे वय पूर्ण झालेले स्वतंत्र व्यवसायाची पत्रकार / छायाचित्रकार पात्र असतील.
  • किमान सलग 10 वर्षे अधिस्वीकृतीधारक असलेले पत्रकार व वयाची 60 वर्षे पूर्ण झालेला असावा.
  • अधिस्वीकृतीधारक नसलेल्या पत्रकारांच्या बाबतीत अधिस्वीकृतीपत्रिकेसाठी असलेले निकष पूर्ण करीत असेलेले पत्रकार यांचा योजनेसाठी विचार करण्यात येईल याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार समितीला असेल.
  • ज्या पत्रकारांना ईपीएफ (EPF ) योजना (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्रोतातून निवृत्ती वेतन किंवा निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळालेले / मिळत नसेल अशा पत्रकारांसाठीच जेष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू राहील.
  • जेष्ठ पत्रकार कि ज्यांची उपजीविका केवळ पत्रकारितेवर अवलंबून आहे आणि अन्य कोणत्याही नोकरी व्यवसाय यामध्ये नाही / नव्हते असे जेष्ठ पत्रकार.
  • गंभीर गुन्ह्यामध्ये दोषसिध्दी होऊन शिक्षा झालेली आहे अशा पत्रकारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
  • या योजनेसाठी जेष्ठ पत्रकार ज्या प्रसार ज्या प्रसार माध्यमामध्ये पत्रकारिता करून निवृत्त झाले त्या प्रसार माध्यमातील संबंधित वृत्तपत्रे नियमित असावे.वृत्तवाहिनी असल्यास ती अधिकृत व सक्षम प्राधिकाऱ्याकडे नोंदणीकृत असावी.
  • या योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणारा पत्रकार आयकर भरणारा नसावा.
  • सादर सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची रक्कम लाभार्थी हयात असेपर्यंतच मिळेल लाभार्थी पत्रकाराच्या मृत्यूपश्चात सदर सन्मान योजनेचा लाभ त्याच्या कुटुंबीयास देय असणार नाही.
  • अर्जदाराने त्यांच्या पत्रकारिता कारकिर्दीतून निवृत्ती घेतली पाहिजे आणि त्यांना कोणतेही नियमित उत्पन्न स्रोत नसावा.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा अर्ज
  • वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला)
  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • पॅन कार्डची साक्षांकित प्रत
  • शैक्षणिक माहितीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
  • राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील
  • अनुभवाचा पुरावा (ज्या ज्या माध्यमात काम केले आहे तेथील आदेश)
  • माध्यमामध्ये काम करताना मिळालेल्या वेतनाचा / मानधनाचा पुरावा.
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला)
  • अर्जातील माहिती खरी असल्याबाबत विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदार व्यक्ती पत्रकार नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास
  • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत दरमहा मानधनाचा लाभ घेत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराकडे 30 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीने त्यांचे वय 60 वर्ष पूर्ण होण्याअगोदर अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल
  • या योजनेसाठी जेष्ठ पत्रकाराने आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमधून लाभ मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी / उपसंचालक (विभागीय माहिती कार्यालय) / उपसंचालक (वृत्त), मुंबई यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सदर करावा.
  • अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील महासंचालक,(माहिती व जनसंपर्क) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून तपासण्यात येईल व लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
Telegram GroupJoin
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना अर्जडाउनलोड
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
कार्यालय पत्तामाहिती व जनसंपर्क महासंचालनालय
तळमजला, मंत्रालय, महाराष्ट्र शासन,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई- 400 032
दूरध्वनी क्रमांक(022) 22024050
शासन निर्णययेथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

Join WhatsApp Group!