केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे.
या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारे 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे.
या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्या बँक किंवा पोस्ट खात्याला सुकन्या समृद्धी योजना असे म्हणतात.
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये व अधिकतम १.५ लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त 15 वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात पुढील 15 ते 21 वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते या योजनेत 35.27 टक्के तुमची गुंतवणूक असते आणि 64.73 टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव अशी योजना आहे ज्यात तुम्ही फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळवू शकता.
नवीन अपडेट
आधी एका परिवारातील फक्त 2 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचे नाव | Sukanya Samriddhi Yojana Marathi |
लाभार्थी | कुटुंबातील लहान मुली |
लाभ | आर्थिक सहाय्य |
उद्देश | मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे |
अर्ज करण्याची पद्धत | पोस्टाच्या माध्यमातून |
Sukanya Samriddhi Yojana In Marathi चे मुख्य उद्दिष्ट
- मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
- मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
- भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- भविष्यात मुलींना स्वतःच्या पायावर उभे करणे
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त 15 वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत.
- या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
- मुलीचे वय 21 वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त 50 टक्के रक्कम काढता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला 50/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
- सुकन्या समृद्धी योजना 100 टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील 21 वर्षाखालील सर्व जाती धर्माच्या मुली या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
- सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे.
- या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते.
- या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
- मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
- कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
- कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
- जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
- या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त 15 वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील 15 ते 21 वर्षे पैसे भरावे लागत नाहीत.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त 100/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान 30,000/- रुपये ते 75,000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला 600/- रुपये शिष्यवृत्ती प्रति 6 महिने आठवी नववी दहावी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
- अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
योजनेअंतर्गत होणारे नुकसान:
- या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे 21 वर्षाचा असतो.
- या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर 7.6 टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या 21 वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.
- या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक 1.5 लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त 10 वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.
- जर एखाद्या कुटुंबात 2 मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या 2 खाती उघडून याचा लाभ घेता येईल.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
- मातेच्या दुसऱ्या प्रसूती वेळी जर जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांना ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
- सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम च्या साह्याने पैसे भरता येतात.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
- मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.
- फक्त मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
- मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
योजनेअंतर्गत खाते कधी बंद करता येते:
- सुकन्या समृद्धी खाते उघडून 5 वर्षे पूर्ण झाल्यावर सदर खाते बंद करता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- लाभार्थ्याला एखादा आजार झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- मुलीच्या जन्माचा दाखला
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- विज बिल
- मुलीच्या आई-वडिलांचा फोटो रहिवासी प्रमाणपत्र
कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे हे मुलीच्या आईवडिलांचे असणे आवश्यक आहे जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीत मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे असणे आवश्यक असेल.
Sukanya Samriddhi Yojana Interest Rate (Old):
वर्ष | व्याजदर |
03.12.2014 TO 31.03.2015 | 9.1 |
01.04.2015 TO 31.03.2016 | 9.2 |
01.04.2016 TO 30.09.2016 | 8.6 |
01.10.2016 TO 31.03.2017 | 8.5 |
01.04.2017 TO 30.06.2017 | 8.4 |
01.07.2017 TO 31.12.2017 | 8.3 |
01.01.2018 TO 30.09.2018 | 8.1 |
01.10.2018 TO 30.06.2019 | 8.5 |
01.07.2019 TO 31.03.2020 | 8.4 |
01.04.2020 TO 30.12.2021 | 7.6 |
Sukanya Samriddhi Yojana Interest Rate:
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 2015 साली केली गेली त्या वेळी व्याजदर 9.1 टक्के होता. वर्तमान स्तिथीमध्ये हाच व्याजदर कमी होऊन 7.6 टक्के आहे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर सदर व्याजदर अवलंबून असतो.
योजनेअंतर्गत रकमेचे कॅल्क्युलेशन खालील प्रकारे केले जाते:
Year | Opening Balance | Deposit | Interest | Closing Balance |
1 | 0 | 5000 | 380 | 5380 |
2 | 5380 | 5000 | 789 | 11169 |
3 | 11169 | 5000 | 1229 | 17398 |
4 | 17398 | 5000 | 1702 | 24100 |
5 | 24100 | 5000 | 2212 | 31312 |
6 | 31312 | 5000 | 2760 | 39071 |
7 | 39071 | 5000 | 3349 | 47421 |
8 | 47421 | 5000 | 3984 | 56405 |
9 | 56405 | 5000 | 4667 | 66071 |
10 | 66071 | 5000 | 5401 | 76473 |
11 | 76473 | 5000 | 6192 | 87665 |
12 | 87665 | 5000 | 7043 | 99707 |
13 | 99707 | 5000 | 7958 | 112665 |
14 | 112665 | 5000 | 8943 | 126607 |
15 | 126607 | 0 | 9622 | 136230 |
16 | 136230 | 0 | 10353 | 146583 |
17 | 146583 | 0 | 11140 | 157723 |
18 | 157723 | 0 | 11987 | 169710 |
19 | 169710 | 0 | 12898 | 182608 |
20 | 182608 | 0 | 13878 | 196487 |
21 | 196487 | 0 | 14933 | 211420 |
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी 50,000/- रुपये गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6 टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 1,26,607/- इतकी रक्कम मिळेल तर 21 वर्षाला एकूण 2,11,420/- रुपये मिळतील.
तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला 21 वर्षानंतर मिळेल.
योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी:
खालीलीपैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सुकन्या समृद्धी बँक खाते उघडता येते.
- इंडियन ओवसीज बँक Indian Overseas Bank
- इंडियन बँक Indian Bank
- आईडीबीआई बँक IDBI Bank
- आईसीआईसीआई बँक ICICI Bank
- देना बँक Dena Bank
- कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
- सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India
- केनरा बँक Canara Bank
- बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
- बँक ऑफ इंडिया Bank of India
- बँक ऑफ बड़ौदा Bank of Baroda
- एक्सिस बँक Axis Bank
- आंध्रा बँक Andhra Bank
- इलाहाबाद बँक Allahabad Bank
- भारतीय स्टेट बँक State Bank Of India
- स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank of Mysore
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank of Hyderabad
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank of Travancore
- स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर State Bank of Bikaner and Jaipur
- स्टेट बँक ऑफ पटियाला State Bank of Patiyala
- विजया बँक Vijaya Bank
- यूनाइटेड बँक ऑफ इंडिया United Bank of India
- यूनियन बँक ऑफ इंडिया,
- यूको बँक Uco Bank
- सिंडिकेट बँक Syndicate Bank
- पंजाब नेशनल बँक Panjab National Bank
- पंजाब एंड सिंध बँक Panjab and Sind Bank
- ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank of Commerce
योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे:
- अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार मुलीने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- मुलीचे वय 10 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
योजनेचा बँकेत अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत:
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज बँकेत जमा करावा.
- बँकेकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
- पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचा पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत:
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज पोस्टात जमा करावा.
- पोस्टाकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
- पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
- अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
Telegram Group | Join |
Sukanya Samriddhi Yojana Official Website | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेसाठी पोस्टाचा अर्ज | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज | क्लिक करा |
सुकन्या समृद्धी योजनेचा शासन निर्णय | क्लिक करा |
Can i Deduct Sukanya Samrudhi Yojana Premium monthly
Yes U Can
Document beby che ky ky lagtat
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत फॉर्म भरताना मुलीचे आधार कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स फॉर्म सोबत जोडावी लागते व अन्य कागदपत्रे ही मुलीचे आई आणि वडील यांची लागतात. जर मुलीचे आधार कार्ड काढले नसेल तर काही हरकत नाही जेव्हा तुम्ही मुलीचे आधार कार्ड काढाल तेव्हा त्याची झेरॉक्स जमा करावी.
Konte konte document lagtat ani Ani posta direct jaun Open karu shakta ka online Kahi facility ahet
सुकन्या समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध नाही आहे त्यामुळे तुम्हाला पोस्ट किंवा बँक खात्यात जाऊन अर्ज करावा लागेल त्यासाठी तुमच्याजवळ फक्त मुलीचे आधार कार्ड व जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे.जर मुलीचे आधार कार्ड उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत पालकांचे आधार कार्ड मान्य असेल जेव्हा मुलीचे आधार कार्ड तयार होईल तेव्हा त्याची झेरॉक्स जमा करावी.
माझी मुलगी 5 वर्षांची असताना मी सुकन्या योजना सुरू केली .ती आज 13 वर्षांची आहे. तर मला अजून किती वर्षांपर्यंत पैसे भरता येतील. म्हणजे ती पुढच्या वर्षी 14 वर्षांची होतेय पण खाते सुरू करून 8 वर्ष झाले आहेत.तर अजून किती वर्ष मी पैसे भरू शकते
मुलीचे वय १४ वर्ष होईपर्यंतच तुम्हाला पैसे भरण्याची गरज आहे व तुमच्या मुलीचे वय १४ ते २१ वर्ष होईपर्यंत तुम्हाला पैसे भरण्याची गरज नाही.
एका वर्षात किती रक्कम भरू शकतो. 1000 रू दर वर्षी भरले तर चालतील का?
दरवर्षी १०००/- रुपये भरलेत तरी चालेल.
BEST SCEME
माझी मुलगी 9वर्षाची असताना खाते उघडले होते आता तिचे वय 16 वर्ष झाले आहे तरी मला अजून किती वर्ष हप्ते भरावे लागतील आणि मला तिचे वय 21वर्ष पूर्ण झाल्या नंतर सह व्याज किती रक्कम मिळेल वार्षिक हप्ता 12000 रुपये आहे
आम्ही या आर्टिकल मध्ये लाभाचा तक्ता दिला आहे ज्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील.