प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)

आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते 
त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषक आहार मिळत नाही परिणामी गर्भवती माता कुपोषित राहून त्याच्यावर व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या पोटात असलेल्या नवजात बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
तसेच प्रसूती नंतर शारीरिक क्षमता नसताना सुद्धा महिलांना स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी मजुरी करावी लागते त्यामुळे मातेचे शरीर पूर्णपणे बरे होण्यापासून रोखले जाते आणि पहिल्या 6 महिन्यांत त्यांच्या लहान बाळाला केवळ स्तनपान देण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो.

कमी पोषणाच्या आहारामुळे भारतातील बहुसंख्य महिलांवर याचा विपरित परिणाम होत असतो व कुपोषित आई कमी वजनाच्या बाळाला जन्म देते.
एका सर्वेनुसार भारतात प्रत्येक तिसरी स्त्री ही कुपोषित आहे आणि प्रत्येक दुसरी स्त्रीला रक्तक्षय आहे. त्यामुळे गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे व स्तनदा मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्याना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ची सुरवात संपूर्ण देशात केली.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

पंतप्रधान मातृ वंदना योजना चा मुख्य उद्देश गर्भवती महिलांच्या आरोग्यावर भर देऊन बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा आहे.

योजनेचे नाव Matru Vandana Yojana Marathi
विभागमहिला व बालविकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017
योजनेचे लाभार्थी देशातील महिला
(पहिल्या जिवंत मुलाच्या जन्मादरम्यान
गर्भवती महिला आणि
स्तनपान करणाऱ्या माता)
लाभ6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) चे उद्दिष्ट

  • नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाचा मुख्य उद्देश आहे.
  • स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे जेणेकरून बाळाच्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल.
  • महिलेच्या गर्भपणात आणि तिच्या प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करतेवेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर भर देणे.
  • गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे.
  • गर्भवती महिलांना त्यांच्या गरोदर पणाच्या दिवसांत लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • गर्भवती महिलांचे आरोग्य अबाधित राखणे.
Pradhanmantri Matruvandana Yojana Maharashtra

योजनेचे वैशिष्ट्य:

  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरवात राज्यात 1 जानेवारी 2017 पासून करण्यात आली.
  • मातृ वंदना योजना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आली आहे.
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी महिलांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती महिलांना स्वतः अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण गर्भवती महिला ज्या हॉस्पिटल मध्ये तपासणी करण्यासाठी जातात तेथील आरोग्य सेविकांद्वारे गर्भवती महिला अर्ज भरला जातो.

योजनेचे लाभार्थी:

  • 1 जानेवारी 2017 नंतर राज्यातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
  • जर एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्मल्यास अशा परिस्थितीत देखील त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.
  • केंद्र सरकार आणि राज्य शासनात नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश आई आणि तिच्या बाळाची देखभाल करणे आहे त्यामुळे मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस 3 टप्य्यात पहिल्या जीवित अपत्यापर्यंत 6,000/- रुपये इतकी रक्कम लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते.
  • सरकार पहिल्या टप्यासाठी 1,000/- रुपये व दुसऱ्या टप्यासाठी 2,000/- रुपये आणि तिसऱ्या टप्यासाठी 2,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करते. व आई जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजना अंतर्गत उर्वरित 1,000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.
  • पात्र लाभार्थ्याला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत संस्थात्मक प्रसूतीसाठी दिले जाणारे प्रोत्साहन मिळेल आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळालेले प्रोत्साहन हे मातृत्व फायद्याकडे गणले जाईल जेणेकरून एका महिलेला सरासरी 6,000/- रुपये मिळतील.

योजनेचा फायदा:

  • या योजनेच्या सहाय्याने गर्भवती महिलांना पोषक आहार मिळण्यास मदत होईल त्यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्माला येणार नाही.
  • राज्यातील गर्भवती महिला सकस आहार मिळवण्यास सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महिलांना त्यांच्या गरोदरपणात काम करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांना प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल,
  • गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • फक्त भारतातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • भारताच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 19 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
  • 1 जानेवारी 2017 किंवा त्या नंतर गर्भधारणा केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल.
  • लाभार्थी या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे.
  • पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिला भविष्यात कोणतीही गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल.
  • मातृ वंदना योजना फक्त पहिल्या अपत्यापुरतीच असून या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.
  • एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • फक्त गर्भवती महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी महिला व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे.
  • महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड आवश्यक.
  • अर्जदार महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • महिलेचा / पतीचा मोबाईल क्रमांक
  • अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • घरपट्टी पावती
  • वीजबिल रेशन कार्ड
  • ई-मेल आयडी
  • रहिवाशी दाखला

योजनेचा लाभ 3 टप्प्यात विभागला गेलेला आहे त्यामुळे लाभार्थ्यास 3 टप्याचा लाभ घेण्यासाठी त्या त्या टप्यानुसार लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल:

  • 1, 2 आणि  3 टप्यातील अर्ज अंगणवाडी केंद्र / मान्यताप्राप्त आरोग्य सुविधेत सादर करणे आवश्यक आहे व भरलेल्या सादर अर्जाची पोचपावती घ्यावी.

लाभाच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी:

  • अर्ज क्रमांक 1 भरून त्या अर्जा सोबत MCP कार्ड (माता व बालसंरक्षण प्रमाणपत्र) व बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.

दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी:

  • पहिल्या टप्यासाठी भरलेला अर्ज व गर्भधारणा झाल्यापासून 6 महिन्यानंतर प्रसुतीपूर्व किमान 1 तपासणी (ANC) केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तिसर्‍या हप्त्याचा दावा करण्यासाठी:

  • लाभार्थ्याने रीतसर भरलेला फॉर्म 1 सादर करणे आवश्यक आहे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच बाळाला आवश्यक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद किंवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत अनुदान लाभ व वितरण खालीलप्रमाणे:

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत पात्र लाभार्थी गर्भवती महिलेस 6,000/- रुपये तिच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात 3 टप्य्यात जमा केली जाईल.

1. पहिला हप्ता

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात  गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता 1000/- रुपये प्राप्त करता येईल. 

2. दुसरा हप्ता

प्रसुतीपूर्व किमान 1 तपासणी केल्यास व गर्भधारणा करून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2000/- रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

3. तिसरा हप्ता

योजनेअंतर्गत तिसरा हप्ता मिळवण्यासाठी प्रसूती नंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी करावी लागते तसेच त्या जन्मलेल्या बालकास बीसीजी, ओपीवी, डीपीटी, हेप्टाईटीस बी लसीकरण द्याव्या लागतात त्यानंतर तिसरा हप्ता 2,000/- रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

तसेच गर्भवती महिलेची एखाद्या शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 700/- रुपये व शहरी भागात 600/- रुपये लाभ दिला जातो.

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:

  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
  • गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला गर्भवती नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • गर्भवती महिलेने दुसऱ्या प्रसूतीसाठी अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.

योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील / जिल्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा
  • या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 3 टप्यात दिला जातो त्यामुळे 3 अर्ज दिले जातात.
  • हे 3 अर्ज त्या त्या वेळी विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करावा व भरलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी.

अर्ज सादर करण्याबाबत व संपर्क कार्यालय:

क्षेत्रसंपर्क कार्यालय
ग्रामीण क्षेत्रग्रामीण भागात आरोग्य केंद्र सहाय्यक यांचे कडून
सदर योजनेचा अर्ज दिला जाईल व स्वीकारला जाईल.
नगरपालिका क्षेत्रनगरपालिका क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र
सदर योजनेचा अर्ज वितरित करतील व स्वीकारतील.
महानगरपालिका क्षेत्र मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात
आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थी महिलेस अर्ज देऊन तो स्वीकारतील.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर Home Page वर गेल्यावर Login Form दिसेल.
  • Login Form मध्ये विचारलेले सर्व माहिती ( Email Id, Password, Captcha Code) भरून Login बटणावर क्लिक करावे.
  • Login केल्यावर अर्जदार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती भरुन अर्ज सबमिट करावा.
  • अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येतो.
Telegram GroupJoin
Toll Free Number011-23382393
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
पत्ताMinistry of Women and Child Development,
Government of India
Shastri Bhawan,
New Delhi 011-23382393
मातृत्व वंदना योजना अर्ज 1येथे क्लिक करा
मातृत्व वंदना योजना अर्ज 2येथे क्लिक करा
मातृत्व वंदना योजना अर्ज 3येथे क्लिक करा
मातृत्व वंदना योजना माहितीयेथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!