मोफत पिठाची गिरणी योजना

राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती पिठाची गिरणी व्यवसाय सुरु करता यावा या करीत 100 टक्के अनुदानावर पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच महिलांना घर बसल्या रोजगार सुद्धा प्राप्त होणार आहे.

योजनेचे नावपिठाची गिरणी योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग
उद्देश्यमहिलांना रोजगार उपलब्ध करून देणे
लाभ100 टक्के अनुदानावर पीठ गिरणीचे वाटप
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

मोफत पिठाची गिरणी योजना सुरु करण्यामागचा शासनाचा मुख्य उद्देश

  • महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करून देणे.
  • महिलांना स्वावलंबी बनविणे.
  • महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
  • महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.

मोफत पिठाची गिरणी योजनेचे वैशिष्ट्य

  • राज्यातील अनुसुचित जाती / जमाती मधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात आली आहे.
  • महिला व बालकल्याण विभागाद्वारे मोफत गिरणी वाटप करण्यात येते आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे.
पीठ गिरणी योजना

मोफत पिठाची गिरणी योजनेचे लाभार्थी

  • राज्यातील अनुसुचित जाती / जमाती मधील महिला
मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
  • या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती / जमातीच्या महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान दिले जाते.
  • गिरणीच्या कोटेशन/बिलावर 90% सबसिडी दिली जाते व उर्वरित 10% रक्कम लाभार्थ्याला स्वतः जवळील भरावी लागेल.
मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिलांना होणार फायदा
  • या योजनेअंतर्गत महिलांना 90 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळेल.
  • पिठाच्या गिरणी च्या सहाय्याने महिला स्वतःचा घरगुती उद्योग सुरु करू शकतील.
  • ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • महिला स्वावलंबी बनतील.
  • महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.
  • महिलांना नोकरीच्या शोधात वणवण फिरण्याची गरज भासणार नाही.
  • ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • फक्त अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील महिलाच या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • फक्त ग्रामीण भागातील महिलाच या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाबातील महिलाच या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र अंतर्गत फक्त 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिलाच या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
  • अर्ज
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रेशनकार्ड
  • पीठ गिरणी कोटेशन/बिल
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • ई-मेल आयडी
  • वीजबिल
  • पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
  • मोबाईल क्रमांक
मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
  • अर्जदार महिलेला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हाकार्यालयात महिला व बालविकास विभागात जाऊन पीठ गिरणी योजना चा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व भरलेला अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थी निवड पद्धत
  • सादर झालेले अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयात महिला व बालविकास विभागात पाठविले जातात.
  • विभाग अधिकारी सादर अर्जाची तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी करतात.
  • कागदपत्रांची तपासणी करून अधिकारी महिलांची या योजनेअंतर्गत निवड करतात.
  • निवड झालेल्या महिलांना मोबाईल वर मेसेज करून किंवा फोन करून कळविण्यात येते.
Telegram Group 1Join
Telegram Group 2Join
Facebook Page 1Follow
Facebook Page 2Follow
पीठ गिरणी योजना अर्जDownload

Join WhatsApp Group!