प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण प्रधानमंत्री किसान समृद्धी योजनेसंबंधी तक्रार करण्यासाठी बद्दल जाणून घेणार आहोत कि kisan helpline number वर कॉल करण्याची वेळ काय आहे pm kisan helpline number वर कॉल केल्यावर किती वेळात प्रश्नाचे उत्तर दिले जाते pm kisan customer car number वर कॉल केल्यावर कोणते प्रश्न विचारतात pm kisan help desk number टोल फ्री आहे का या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

केंद्र सरकार कडून देशातील शेतकयांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते जी थेट शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केली जाते या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम २०००/- प्रमाणे हप्त्यांत दिली जाते परंतु योजेनची योग्य माहिती नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते व काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने सदर अर्ज करता येत नाही तसेच अर्ज केल्यावर सुद्धा अर्जातील खूप साऱ्या चुकांमुळे / त्रुटींमुळे त्यांचा या योजनेअंतर्गत केलेला अर्ज रद्द केला जातो व त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
त्यामुळे जर आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल व या योजनेची अधिक माहिती हवी असेल किंवा आपण जर या योजनेचा लाभ घेतला असेल परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली नसेल तर pm kisan helpline number ला संपर्क करू शकता व तुमच्या समस्यांचे समाधान मिळवू शकता.

शेतकऱ्यांसाठी त्याच्या राज्यानुसार pm kisan customer care number सुरु करण्यात आले आहेत ज्यावर कॉल करून शेतकरी त्यांच्या समस्यांचे समाधान मिळवू शकतो.

जेव्हा तुम्ही kisan helpline number 1800-180-1551 वर कॉल करता तेव्हा तुम्हाला तुमची भाषा (आयव्हीआर) निवडण्यासाठी सांगितले जाते ज्यामुळे तुम्ही तुमच्या राज्यातील स्थानिक भाषेत बोलू शकता.

तुमच्या राज्यानुसार / जिल्हयानुसार / भाषेनुसार प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.

pm kisan help desk number वर कॉल करण्याआधी शेतकऱ्याने घ्यावयाची काळजी

जेव्हा तुम्ही एखाद्या समस्या संदर्भात  kisan call center वर कॉल करता तेव्हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजेचा प्रतिनिधी तुमचा कॉल उचलतो व तुमच्या खात्याच्या सुरक्षा कारणात्सव काही प्रश्न विचारतो जेणेकरून इतर कोणती व्यक्ती तुमच्या खात्याची माहिती जाणून घेता कामा नये त्यामुळे समोरच्या प्रतिनिधी ने विचारलेल्या कागदपत्रांची माहिती तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे खालील माहिती कॉल करायच्या आधी तुमच्या जवळ ठेवा

  • अर्जदाराचे नाव
  • अर्जदाराची जन्मतारीख
  • अर्ज क्रमांक
  • आधार क्रमांक
  • मोबाईल क्रमांक
  • तुमचा कायमचा पत्ता
  • तुमच्या तालुक्याचे नाव इत्यादी

सदर माहिती विचारल्यावर प्रतिनिधी तुमची समस्या ऐकून घेईल व तुमची समस्या सोडविण्यासाठी तुमहाला मदत करेल त्यामुळे तुमच्या समस्यांचे समाधान मिळवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रतिनिधीने दिलेल्या उत्तरामुळे जर तुमचे समाधान झाले नसेल किंवा तुमच्या समस्येचे उत्तर मिळत नसेल तर अशा वेळेस तुमच्या समस्येबद्दल तक्रार नोंदवली जाईल व तुम्हाला एक तक्रार नंबर दिला जाईल

तुमची तक्रार नोंदविल्यानंतर ती सोडवण्यासाठी ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.तुम्ही pm kisan helpline number वर कॉल करून तुमचा तक्रार नंबर सांगून स्तिथी जाणून घेऊ शकता.

kisan call center Timing

एखाद्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची माहित हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा या योजनेअंतर्गत लाभ घेऊन सुद्धा योजनेचा हप्ता मिळण्यास काही अडचण येत असेल तर सकाळी १० ते संध्याकाळी ५ ज्या वेळेत कॉल करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारा प्रत्येक शेतकरी pm kisan customer care number ला कॉल करून त्याच्या समस्यांचे समाधान मिळवू शकतो कारण शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच kisan helpline number सुरु करण्यात आले आहेत.

तुमच्या कोणत्याही समस्येसंदर्भात कॉल करू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात येतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई-मेल सेवा

शासनाने या योजनेअंतर्गत ई-मेल सेवा देखील सुरु केली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्यांचे समाधान मिळवू शकता.

जर आपल्याला ई-मेल च्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तक्रारींचे समाधान हवे असल्यास शासनाच्या [email protected] वर मेल करू शकता.

देशातील प्रत्येक राज्यात / जिल्हयात प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसंबंधी समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण मंच सुरु केले आहेत तुम्ही स्वतः त्या केंद्रात जाऊन तुमच्या समस्यांचे समाधान मिळवू शकता परंतु जाताना सोबत सदर योजनेसंबंधी सर्व कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.

शासनाची अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

सारांश

आशा करतो कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तक्रारीसाठी pm kisan customer care number बद्दल आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले kisan helpline number बद्दल काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Join WhatsApp Group!