जर तुम्हाला एस.टी.चे वाहक म्हणून काम करायचे असेल तर भरतीच्या वेळेस अर्ज करताना तुमच्याजवळ ‘एलकॉन लायसेन्स’ म्हणजेच वाहक परवाना अथवा बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. परंतु अनेकांना बॅच बिल्ला परवाना कसा मिळवायचा व त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तसेच किती शुल्क आकारले जाते त्याविषयी माहिती नाही त्यामुळे आपणं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
नमस्कार मित्रानो मी स्वतःचा एसटी मध्ये वाहक पदासाठी अर्ज केला होता त्यासाठी मला चालक / वाहक परवाना (बॅच बिल्ला ) याची आवश्यकता होती त्यामुळे मी परिवहन कार्यालयात जाऊन बॅच बिल्ला काढला त्यामुळे मी बॅच बिल्ला कसा काढला याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील परिवहन कार्यालयात जाऊन चालक/वाहक परवाना (बॅच बिल्ला) अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- भरलेला अर्ज व कागदपत्रे घेऊन तुम्हाला परिवहन कार्यालयात चालक/वाहक परवाना खिडकी वर जावे लागेल.
- परिवहन कार्यालयातील कर्मचारी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करेल व तुमच्याकडून आवश्यक नोंदणी शुल्क (100/- रुपये ) घेईल.
- नोंदणी शुल्क भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा भरलेला अर्ज, कागदपत्रे व नोंदणी पावती घेऊन मोटार वाहन निरीक्षक कार्यालयात जावे लागेल.
- मोटार वाहन निरीक्षक तुमची तोंडी परीक्षा घेईल त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारेल यात ते एस.टी.चे नियम व रस्ते वाहतुकीचे नियम, आदींविषयी प्रश्न विचारले जातात.
- तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यावर तुम्हाला पास करण्यात येईल.
- तुम्ही पास झाल्यावर तुम्हाला पुन्हा परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांकडे पाठविले जाईल त्यांच्याजवळ तुम्हाला तुमचा अर्ज, कागदपत्रे जमा करावे लागतील.
- परिवहन कर्मचारी तुम्हाला तुमचा वाहक/चालक परवाना कधी मिळणार हे सांगेल व तुम्ही अर्ज भरलेल्या पोच पावतीच्या मागे तुम्हाला बॅच बिल्ला कधी मिळेल याची तारीख लिहेल.
- तुम्हाला ज्या तारखेला तुमचा वाहक/चालक परवाना मिळणार आहे त्या तारखेला जाऊन बॅच बिल्ला घ्यायचा आहे.
मोटार वाहन निरीक्षक यांच्यामार्फत विचारले जाणारे प्रश्न:
- मोटार वाहन निरीक्षक एस.टी.चे नियम व रस्ते वाहतुकीचे नियम, आदींविषयी प्रश्न विचारतात.
चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना काढण्यासाठी आवश्यक नोंदणी शुल्क:
- चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना काढण्यासाठी 100 /- रुपये नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
नोंद: (नोंदणी शुल्क वाढली असू शकते)
चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना काढण्यासाठी अर्ज कोठे करावा लागतो:
- चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो.
- किंवा मोटार वाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो
चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना मिळण्यासाठी लागणारी कालावधी:
- जर तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करत असाल तर तुम्हाला चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना मिळण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागतो.
चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना काढण्यासाठी आवश्यक नियम व अटी:
- अर्जदार हा कमीत कमी इयत्ता 10वी उत्तीर्ण असावा.
- अर्जदाराला वयाची 20 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- बस चालकासाठी (गोल बॅच) तर टॅक्सी चालकासाठी (त्रिकोणी बॅच) काढावा लागतो तसेच टॅक्सी बॅच काढण्यासाठी अर्जदाराजवळ हलके मोटार वाहन चालविण्याचे तसेच परिवहन (एसटी) वाहन चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे.
- टॅक्सी बॅच काढण्यासाठी हलके मोटार वाहन चालविण्याचा किमान 2 वर्षांचा किंवा मध्यम जड वाहन चालविण्याचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात येतो.
आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- पोलीस व्हेरिफिकेशन
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
चालक / वाहक (बॅच बिल्ला) परवाना काढण्यासाठी ऑनलाईन कर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर तुम्हाला Conductor Licence मध्ये जाऊन तुम्हाला New Conductor Licence वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Continue बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या State RTO Office मध्ये तुमच्या RTO कार्यालयाची निवड करायची आहे. व तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (Personal Details, Address Details, Medical Details) भरावयाची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट | Click Here |