Post Office Gram Suraksha Scheme In Marathi

भारतीय पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांसाठी काही ना काही बचत योजना राबवत असतात तसेच पोस्टात गुंतवलेले पैसे नेहमी सुरक्षित मानले जातात व सरकार याची हमी सुद्धा देते त्यामुळे ग्राहकांचा सुद्धा पोस्टाद्वारे राबविलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद असतो. त्यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस ने ग्राहकांसाठी एक नवीन पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची सुरवात केली आहे हि एक विमा योजना आहे

या योजनेअंतर्गत ग्राहक रोज 50/- रुपये जमा करून 35 लाख रुपयांचा निधी उभारू शकतात. या योजनेची दरमहा गुंतवणूक 1500/- रुपये इतकी आहे या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने भरला जाऊ शकतो. जर प्रीमियम भरण्यासाठी विलंब झाल्यास प्रीमियम भारण्यावर 30 दिवसांची सवलत मिळू शकते.

वय 19 ते 55 वर्षापर्यंतच्या कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो. या योजने अंतर्गत किमान विमा रक्कम 10 हजार रुपये इतकी आहे व अधिकाधिक विमा रक्कम 10 लाख रुपये इतकी आहे.
या योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत बोनस दिला जातो म्हणजेच 1 लाखाच्या विमा रकमेवर 1 वर्षाचा बोनस 6000/- रुपये इतका दिला जातो.

या योजनेअंतर्गत डेथ बेनेफिट व्यतिरिक्त मॅच्युरिटी चे पैसे देखील दिले जातात आणि या दोन्ही फायद्यामध्ये बोनस लाभ देखील दिला जातो. या योजनेला जीवन विमा योजना असे देखील म्हणतात कारण विमाधारक जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पॉलिसी चा फायदा लाभार्थ्याला मिळतो.

वाचकांना नम्र विनंती

आम्ही पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे त्यामुळे आमचे हे आर्टिकल तुम्ही शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळावा जर तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक असतील त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावपोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
योजनेचे उद्दिष्टसंपूर्ण जीवन हमी योजना
वय मर्यादा19 ते 55 वर्षे
योजनेची सुरवात कोणी केलीभारतीय पोस्ट ऑफिस
लाभार्थीग्रामीण भागातील नागरिक

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत पॉलिसी सुरु झाल्यावर विमाधारकाला लगेच विमा सुरक्षा सुरु होते.
  • या योजनांमध्ये जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. दररोज फक्त काही रुपये वाचवून एक चांगला फंड तयार करता येईल.
  • या योजने अंतर्गत विमाधारकाला बोनस रक्कम सुद्धा दिली जाते.
  • कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेडिकल चाचणी अनिवार्य आहे परंतु जर एखाद्या लाभार्थ्याला मेडिकल चाचणी करायची नसल्यास या योजनेमधून दिली जाणारी रक्कम 25,000/- रुपये आणि अधिकतम वय मर्यादा 35 वर्षे लागू राहील
  • पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केल्यास विमाधारकाला 31 ते 35 लाखांपर्यंतचा निधी उभारता येऊ शकतो.
  • या योजने अंतर्गत विमाधारकाला कर्जसुद्धा घेता येते परंतु विमाधारकाला पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षानंतरच कर्ज मिळू शकते.
  • या पॉलिसी चे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामांकित/वारसा व्यक्तीला म्यॅच्युरिटी वर लाभ दिला जातो किंवा विमाधारकाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला म्यॅच्युरिटी लाभ मिळतो या योजनेअंतर्गत म्यॅच्युरिटी वायोमर्यादा 50/55/55/60 वर्षे आहे
post office gram suraksha yojana

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत विमाधारकाला दिला जाणारा लाभ

जर एखादी व्यक्ती वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाखाची पॉलिसी सुरु करत असेल तर त्या विमाधारकाला दिवसाला फक्त 50/- रुपये भरून वयाच्या 60 वर्षी 35 लाख रुपये मिळू शकतील.

Maturity
Age
Premium
Payment Term
Your
Age
Monthly
Premium
Total
Bonus
Maturity
Amount
8036551,51521,60,00031,60,000
803958146323,40,00033,40,000
804160141124,60,00034,60,000

योजनेअंतर्गत लाभधारकाला दिला जातो बोनस

  • या योजनेत गुंतवणूक केल्यास 4 वर्षानंतर कर्ज सुविधा मिळते. जर एखाद्या पॉलिसीधारकाला ही स्कीम सरेंडर करायची असेल तर ती परत करता येते. योजना सुरु झाल्याच्या 3 वर्षानंतर ही सुविधा मिळते. या योजनेतंर्गत गुंतवणूकीच्या 5 वर्षानंतर बोनस मिळतो.

योजनेअंतर्गत भरला जाणारा हफ्ता

  • योजनेतंर्गत जर तुम्ही 19 वर्षाचे असताना 10 लाख रुपयांच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतणूक करता, तर तुम्हाला वयाच्या 55 व्या वर्षी दर महिन्याला 1,515/- रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तर 58 वर्षांसाठी 1,463/- रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411/- रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील.

योजनेअंतर्गत दिला जाणारा परतावा

ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत पात्र व्यक्तीला दर महिन्याला 1,500/- रुपये म्हणजे दररोज केवळ 50/- रुपयांची गुतंवणूक करावी लागते. कालावधी पूर्ण झाल्यावर त्याला 35 लाखांपर्यंत एक चांगला परतावा मिळू शकतो.

गुंतवणूकदाराला वयाची 55 व्या वर्षी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर ३१ लाख रुपये, 58 व्या वर्षी कालावधी पूर्ण झाल्यावर 33.40 लाख रुपये आणि वयाची 60 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला 34.60 लाख रुपये मिळतील. ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत व्यक्ती 80 वर्षांचा झाल्यावर ही रक्कम त्याला देण्यात येते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला ही रक्कम देण्यात येते.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचा फायदा

  • या योजनेअंतर्गत विमाधारकाला कर्ज,आत्मसमर्पण आणि रूपांतराची निवड करण्याची संधी दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित होते.
  • या योजनेद्वारे विमाधारकाला बोनस सुद्धा दिला जातो.
  • पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत बक्कळ परतावा मिळतो.
  • या योजनेद्वारे आकारले जाणारे प्रीमियम कमी आहे जे सर्व सामान्य गरिबांना परवडणारे आहे.
  • या योजनेचा लाभ भारतात कुठेही आणि कोणत्याही पोस्ट ऑफिस मधून सहजपणे घेता येतो.
  • देशातील ग्रामीण भागातील रहिवाश्यांसाठी सदर योजना उत्पन्नाचे एक चांगले स्रोत आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना पैसे वाचवण्यास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मोठी मदत मिळेल.
  • या योजनेअंतर्गत भरला जाणारा प्रीमियम मासिक,त्रैमासिक,सहामाही किंवा वार्षिक भरण्याची सुविधा विमाधारकाला दिलेली आहे.
  • मृत्यू लाभ : पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाला मृत्यू झाल्यास नॉमिनीला/वारसास मृत्यू लाभ दिला जातो.
  • म्यॅच्युरिटी बेनेफिट : म्यॅच्युरिटीवर विमाधारकाला विम्याची रक्कम आणि जमा झालेला बोनस दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत न भरलेला प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुन्हा चालू केली जाऊ शकते.
  • या योजने अंतर्गत नामांकन/वारस सुविधा उपलब्ध आहे.
  • या योजनेअंतर्गत 36 महिन्यांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा विमाधारकाला या योजने अंतर्गत दिलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत वाढीव कालावधी म्हणून देय प्रीमियम भरण्यासाठी विमाधारकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.
  • विमाधारकाने 48 महिन्यांसाठी प्रीमियम भरल्यानंतर या योजनेअंतर्गत आयकर कायदा 1961 अंतर्गत कलम 80C आणि कलम 88 अंतर्गत विमाधारकाला कर लाभ दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत कमी जोखीम आणि जास्त फायदा मिळतो.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची पात्रता व अटी

  • लाभार्थ्यांचे किमान वय 19 वर्षे असणे आवश्यक आहे व अधिकाधिक वय 55 वर्षे असणे आवश्यक.
  • 55 वर्षावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • लाभ घेऊ इच्छिणारा व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक.
  • हि योजना फक्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच सुरु करण्यात आली आहे.
  • शहरी भागात राहणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • 1 पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विमाधारकाचे जन्माचे प्रमाणपत्र (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला.
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • घरपट्टी पावती
  • मेडिकल चाचणी प्रमाणपत्र
Telegram Groupयेथे क्लिक करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी संपर्क1800 180 5232 / 155232
आधिकारीक वेबसाईटClick Here

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सदर योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.

सारांश

मी आशा करतो कि पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.