आज आपण मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रम काय आहे, medley pharma scholarship, मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणासाठी आहे,मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी पात्रता व अटी काय आहे, मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक,मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्ज करायची पद्धत, मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमासंदर्भात विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी या योजनेच्या लाभ अवश्य घ्यावा.
Medley Pharma Scholarship
मेडले फार्मा शिष्यवृत्ती इयत्ता १०वी नंतरच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित करते. या शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट निरक्षरतेचे निर्मूलन करणे आणि शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे आहे. जेणेकरून त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल या योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना त्यांची जात, पंथ, धर्म, लिंग यांचा विचार न करता आर्थिक मदत दिली जाते.
मेडले फार्मा शिष्यवृत्ती फायदे
Medley Pharma Scholarship Benefits
- या योजनेंतर्गत मंजूर करण्यात येणारी कमाल रक्कम संपूर्ण कार्यक्रमासाठी नॉन-रिफंडेबल आधारावर १००००/- रुपये पर्यंत आहे.
- विद्यार्थ्यांना १००००/- रुपये ते १ लाख रुपया पर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाईल जे परत करण्यायोग्य आहे.
मेडले फार्मा शिष्यवृत्ती पात्रता
Medley Pharma Scholarship Eligibility
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम स्वरूपी राहत असलेला रहिवासी असावा
- अर्जदार विध्यार्थी महाराष्ट्रातील अभ्यासक्रम करत असावेत.
- अर्जदार विध्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण असावा
- अर्जदाराने ज्युनिअर कॉलेज, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन, आयटीआय, मॅनेजमेंट कोर्स इत्यादि मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थ्याला शेवटच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व स्त्रोतांकडून वार्षिक उत्पन्न रुपये २ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
५ वर्षांच्या आत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कर्जाची रक्कम परत करणे आवश्यक आहे. - कर्जाची परतफेड कोर्स पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून किंवा उमेदवाराला नोकरी मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर करणे गरजेचे आहे.
मेडले फार्मा शिष्यवृत्ती अटी व नियम
Medley Pharma Scholarship Terms & Condition
- शिष्यवृत्ती संस्थेच्या नावाने धनादेशाद्वारे शुल्क भरण्याच्या अटींमध्ये वितरित केली जाईल.
- शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय किंवा संस्थेच्या प्रमुखाने शिक्कासहित साक्षांकित केलेला असावा.
- निधीचा गैरवापर टाळण्यासाठी शिष्यवृत्तीचे धनादेश अर्जदाराच्या नावाने जारी केले जाणार नाहीत.
- शिष्यवृत्तीचे अर्ज वर्षभर स्वीकारले जातील.
- शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी नवीन विद्यार्थ्यांचा समावेश वर्षभर होऊ शकतो. तथापि, बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रवेश दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान होतात.
मेडले फार्मा शिष्यवृत्ती कागदपत्रे
Medley Pharma Scholarship Documents
- विद्यार्थ्यांच्या पालकांची पेन्शन स्लिप किंवा पगार पगार स्लिप
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराने प्रमाणित केलेला)
- रीतसर नोटरी केलेल्या निकालाची छायाप्रत (गेल्या तीन शैक्षणिक वर्षांचे निकाल).
- रेशनकार्ड,
- वीज बिल
- आधार कार्ड
- गॅरेंटरचे दस्तऐवज ज्यांचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे (व्याजमुक्त कर्जासाठी लागू)
मेडले फार्मा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धत
Medley Pharma Scholarship Application Process
- शिष्यवृत्तीसाठी सर्वात प्रथम अर्ज डाउनलोड करा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
- अर्जासोबत विचारलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत सोबत जोडा.
- भरलेला अर्ज कागदपत्रांसह ई-मेल किंवा वयक्तिकरित्या खालील पत्त्यावर सबमिट करा
मेडले फार्मा शिष्यवृत्ती अर्ज येथे क्लिक करा
ई-मेल
mail.medleylab.com
मेडले फार्मा शिष्यवृत्तीसाठी पाठवण्याचा पत्ता
मेडले फार्मास्युटिकल्स लिमिटेड
मेडले हाऊस, डी-2,
एमआयडीसी एरिया,
16 वा रोड, अंधेरी (ई),
मुंबई- 400093
सारांश
आशा करतो कि मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सर्व माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले मेडले फार्मा शिष्यवृत्ती कार्यक्रमा संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.