बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना 2024

आम्ही खाली बचत गट गटासाठी आवश्यक कर्ज मागणी अर्ज नमुना कसा असावा याची माहिती दिलेली आहे.

बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना

प्रति,
शाखा व्यवस्थापक,
बँकेचे नाव आणि शाखेचे नाव:
बँकेचा पत्ता:

विषय: कर्ज मागणी अर्ज

मी, (गटाचे नाव) बचत गटाचा अध्यक्ष/सचिव, (आपले नाव), (आपला पत्ता) येथे (गटाचा पत्ता) नावाचा बचत गट चालवतो. आमचा बचत गट (गटाची स्थापना तारीख) रोजी स्थापन झाला आणि (बँकेचे नाव आणि शाखेचे नाव) मध्ये (बचत खाते क्रमांक) क्रमांकाखाली बचत खाते चालवतो. आमचा बचत गट (गटातील सदस्यांची संख्या) सदस्यांचा आहे आणि आम्ही नियमितपणे बचत आणि बैठका घेतो. आमचा बचत गट (कर्जाचा उद्देश) साठी (कर्ज रक्कम) रकमेचे कर्ज घेऊ इच्छितो.

आम्ही कर्जाची रक्कम खालीलप्रमाणे वापरणार आहोत:

 • (व्यवसायाचे नाव) साठी (रक्कम)
 • (व्यवसायाचे नाव) साठी (रक्कम)
 • (व्यवसायाचे नाव) साठी (रक्कम)

आम्ही कर्जाची परतफेड (परतफेडीची योजना) द्वारे वेळोवेळी करू व आम्ही कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहोत हे दर्शविण्यासाठी आम्ही आमच्या बचत गटाची आर्थिक स्थिती दर्शविणारी कागदपत्रे जोडली आहेत. आम्ही आपणास विनंती करतो की आमच्या कर्ज मागणी अर्जाचा विचार करा आणि कर्ज मंजूर करा.

आपले विश्वासू,

 • (आपले नाव)
 • (पद)
 • (बचत गटाचे नाव)
 • (संपर्क क्रमांक)

दोन मुलींसाठी योजना महाराष्ट्र

महतवाच्या गोष्टी

 • बचत गटाचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
 • कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे जेणेकरून एखाद्या कागदपत्राविना अर्ज नाकारला जाणार नाही
 • हे लक्षात ठेवा कि कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी तुमच्या बचत गटाची आर्थिक स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमच्या बचत गटाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरच बँक किंवा वित्त संस्था कर्ज मंजूर करते.
 • बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर तसेच अटी काळजीपूर्वक वाचा.
 • मिळालेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करा त्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त व्याजदर आकारला जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या बँकेत, वित्त संस्थेमध्ये किंवा स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि विकास संस्थेशी (SEDI) संपर्क साधा. [बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना]

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना

बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना च्या अटी व शर्ती

स्वयं सहाय्य्यता गट / बचत गट कर्ज

 • बँकेच्या विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज पुर्णपणे भरुन घेण्यात यावा.
 • बचत गटाचे सेव्हींग खाते बँकेकडे असणे आवश्यक आहे. तसेच बचत गटातील सर्व सभासदांची के.वाय.सी. नॉर्म प्रमाणे पुर्तता केलेली असावी.
 • कर्ज मागणी अर्जासोबत सेव्हींग खात्याचा सुरुवातीपासूनचा खातेउतारा तसेच पुर्वीचे कर्ज असल्यास त्याचा खाते उतारा सोबत जोडण्यात यावा.
 • कर्ज घेणे बाबतचा विहित नमुन्यातील बचतगटाच्या ठरावाची प्रत.
 • बचतगटाच्या सर्व सभासदांची यादी पत्त्यासह घेण्यात यावी.
 • बचतगटातील सभासदांनी घेतलेल्या कर्जदार सदस्यांची यादी, ज्यात कर्ज रक्कम, कर्जवाटप दिनांक, कर्ज मुदत दिनांक, कर्जाचा हप्ता, येणे बाकी इ. तपशिलाराह यादी घेण्यात यावी.
 • सदर कर्जास जामीनदार म्हणून संबंधीत बचतगटाचे पदाधिकारी (अध्यक्ष/उपाध्यक्ष / सचिव/ कोषाध्यक्ष घेण्यात यावेत. त्याचे ओळखपत्र व घराच्या पत्त्याचा पुरावा घ्यावा. [बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना]
Join Telegram ChannelClick Here

सारांश

आम्ही तुम्हाला बचत गट कर्ज मागणी अर्ज नमुना अर्जाची संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी तुमचे या संबंधी काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल करून कळवा आम्ही 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.