Apang Divyang Yojana Maharashtra

अपंगांकरीता विविध कल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत. अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी अपंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरीता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याप्रमाणे अपंग-अपंगत्व नसलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

समाजातील अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन दिल्यास निश्चितपणे अपंग व्यक्तींशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्साहित होत याकरीता राज्यात आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेस या शासन निर्णयाव्दारे मंजूरी देण्यात येत आहे.

सदर योजनेची मार्गदर्शक तत्वे / सूचना खालीलप्रमाणे आहेत:

 • अपंग व अव्यंग विवाहितांना प्रोत्साहन देण्याची ही योजना किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेलया सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास सदर योजना लागू आहे.
 • दिनांक 1 एप्रिल 2014 या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहित होणाऱ्या जोडप्यांना सदर योजना लागू होईल.
 • किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा अपंग नसलेल्या वधू किंवा वराने अपंग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल:
बचत प्रमाणपत्र25,000/- रुपयांचे
रोख स्वरुपात20,000 /-
संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल4,500/-
स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.500/- रुपये

सदर योजना मुंबई शहर व उपनगरकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व इतर जिल्हयांकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत राबविण्यात येईल.

apang divyang yojana maharashtra list pdf

योजनेचे उद्दिष्ट:

 • अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे
 • व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी
 • अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे

समाजकल्याण अधिकारी यांचे कार्य:

सर्व समाजकल्याण अधिकारी यांना कळविण्यात येते की या योजनेतंर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात प्राप्त होणारे अर्ज त्या-त्या आर्थिक वर्षात निकाली काढणे आवश्यक राहील. याकरीता सर्व समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांचेकडे प्राप्त झालेले अर्ज हे वर्षातून दोन वेळा निकाली काढणे आवश्यक राहील.

महत्वाच्या तारखा:

 • माहे सप्टेंबर व माहे मार्च या दोन महिन्यात प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांत प्राप्त झालेले अर्ज निकाली काढण्यात येतील.
 • याकरिता एप्रिल व सप्टेंबर या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात समारंभपूर्वक निकाली काढण्यात येतील
 • व ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज मार्च महिन्यात समारंभपूर्वक निकाली काढण्यात येतील.

मुंबई शहर व उपनगर याकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी वरील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

सर्व समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषदा हे प्राप्त झालेल्या अर्जांची योग्य ती छाननी तो प्राप्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसांत करतील. या योजनेतंर्गत अर्थसहाय्याकरीता करावयाच्या अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. या अर्जातील सर्व बाबी पूर्ण असल्याशिवाय समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी अर्जांचा स्विकार करु नये. अर्जामध्ये काही त्रुटी /काही कागदपत्रे कमी असल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्जदाराला तात्काळ त्याठिकाणी तसे सांगण्यात यावे. एकदा जर अर्जदाराकडून अर्ज प्राप्त करुन घेतला तर याचा अर्थ अर्जदारांनी दिलेली सर्व माहिती बरोबर आहे व संबंधित अधिकाऱ्यांनी /कर्मचाऱ्यांनी ही माहिती पाहून व कागदपत्रांची पाहणी करुन हा अर्ज स्विकारलेला आहे असे समजण्यात येईल.
कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराचा अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या अभावी किंवा अर्जात त्रुटी आहेत म्हणून निकाली काढण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. सदर योजनेचे नियंत्रण अधिकारी हे आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे हे राहतील.

आयुक्त, अपंग कल्याण हे जिल्हानिहाय तरतुदींचे वाटप करुन देतील. सदर विवाहित जोडप्यांनी आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत सादर केलेल्या अर्जास अंतीम मान्यता देण्याचे काम समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे स्तरावरच केले जाईल. कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारे मान्यता देण्यासाठी हे प्रकरण सहाय्य आयुक्त, समाज कल्याण (मुंबई शहर व उपनगर वगळता) किंवा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण यांचे स्तरावर पाठविण्यात येऊ नये.

योजनेचे लाभार्थी:

 • अपंग-अव्यंग जोडपे

सदर योजनेच्या अटी शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

 • वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे
 • iअपंग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
 • विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.
 • विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
 • विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा
 • वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी.
 • अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या इतर योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा.

कोणत्याही लाभार्थ्याने या योजनेचा लाभ दोन वेळा घेऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी सादर केलेल्या

 • विवाह नोंदणी दाखला,
 • वर / वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच
 • वर / वधू यांच्या अपंग प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीच्या मागील बाजूस अपंग-अव्यंग विवाह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेले आहे असा रबरी शिक्का मारण्यात यावा.
 • सर्व समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांचे कार्यालयात नोंदवही नमुन्यात माहिती ठेवावी.
 • माहे ऑक्टोबर व माहे एप्रिलच्या पहिल्या आठवडयात सर्व समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नमूद केलेली माहिती आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे पाठवावी. सर्व जिल्हयांची संकलित केलेली जिल्हानिहाय एकत्रित माहिती आयुक्त, अपंग कल्याण यांनी शासनास सादर करावी.

अर्जासोबत खालील सत्यप्रती जोडव्यात:

 • विवाह नोंदणी दाखला (Marriage Certificate )
 • वर व वधु यांचे शाळा सोडण्याचे दाखले. (T.C.)
 • वर / वधु जे अपंगअसतील त्याबाबतचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र. (Disability Certificate).
 • महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 •  वर व वधू यांचे एकत्रित फोटो. (4 x 6 इंच )
 • दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारसपत्रे.
 • यापुर्वी या योजनेखाली लाभ घेतले नसल्याबाबतचे शपथपत्र / अॅफिडेविट
 • वर व वधुचे आधार कार्ड ची प्रत
 • वर व वधु यांचे संयुक्त बँक खाते पासबुकची प्रत.

टीप:

 • अर्ज परिपुर्ण व बिनचुक असल्याशिवाय जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने स्विकारु नये.
 • एकदा अर्ज स्विकारल्यानंतर हा अर्ज परिपुर्ण आहे, सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडलेल्या आहेत असेच समजण्यात येईल.

अर्ज कोठे करावा:

 • सर्व अर्जदारांनी आपला अर्ज भरून सोबत योग्य कागदपत्रे जोडून सदर अर्ज समाजकल्याण अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावा.
Telegram GroupClick Here
Apang Divyang Yojana Maharashtra FormClick Here
GRClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम